प्राजक्तानं केली ‘ही’ मोठी चूक आता चाहते करतायत ट्रोल

मुंबई | मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी सातत्यानं सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करते. चाहते मोठ्या प्रमाणात तिच्या फोटोंना पसंत देखील करतात.

सध्या प्राजक्ताच्या काही फोटोंनी सोशल मीडियावर प्रचंड धुमाकुळ घातला आहे. मोठ्या प्रमाणात प्राजक्ताचे फोटे शेअर केले जात आहेत.

फोटोसोबत प्राजक्तानं एका कवितेची ओळ टाकत एक छान फोटो शेअर केला आहे. ऋतु बरवा गाण्यातील थरथरत्या अधरावर प्रणयी संकेत नवा, ऋतु बरवा, ऋतु हिरवा, ही ओळ लिहीली आहे.

प्रसिद्ध कवयत्री शांताबाई शेळके यांच्या या ओळी आहेत. आपल्या पोस्टखाली कवयत्रीचं नाव टाकताना प्राजक्तानं मोठी चूक केल्याचं दिसत आहे.

शांती शेळके असं तिनं कवयत्रीचं नाव टाकलं आहे. त्यामुळं सर्वत्र तिला ट्रोल करण्यात येत आहे. अशात आता इन्स्टाग्रामच्या पोस्टवर तिनं दुरूस्ती केली आहे.

माहिती नसेल तर लिहीण्याआधी कुणाकडून तर खात्री करून घ्या, उगाच चुकीचं काही करू नका, असा सल्ला आता नेटकरी प्राजक्ताला देत आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी देखील प्राजक्तानं अशीच एक पोस्ट केली होती. त्यावर लिहीताना देखील प्राजक्तानं मोठी चूक केली होती.

पाहा पोस्ट – 

महत्त्वाच्या बातम्या – 

 संभाजी राजेंची आर्त हाक! राज्यभरातील मराठा बांधव पुण्यात येण्याची शक्यता

 सदावर्ते निघाले अयोध्येला! अयोध्येतील साधु-संतांनी आमंत्रण दिल्याचा दावा

 “घोटाळेबाजांवर आता अंतिम कारवाई”; सोमय्यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा

 “राज साहेबांच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही”

सर्वोच्च न्यायालयाचा सर्वात मोठा निर्णय; राजद्रोहाचं कलम तूर्तास स्थगित