मुंबई | अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने (Prajaktta Mali) महाराष्ट्र सरकारकडे एक मागणी केली आहे. याबाबत प्राजक्ताने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, जो सध्या चर्चेत आला आहे.
लहान तोंडी मोठा घास, पण आता बोलायला हवं….आता कोरोनाचा जोर बराच ओसरला आहे. बरेचसे निर्बंध देखील शिथिल झाले आहेत. मात्र चित्रपटगृह आणि नाट्यगृह अजूनही 50% क्षमतेनेच सुरु आहेत. आता बरेच अडकलेले प्रोजेक्ट रिलीज होणार आहेत. तर आता ही मर्यादा हटवून पुन्हा पूर्ण क्षमतेने थिएटर सुरु करावं, असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
‘पावनखिंड’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन हे दिग्पाल लांजेकर यांनी केलं आहे. तर अजय आरेकर, अनिरूद्ध आरेकर आणि भाऊसाहेब आरेकर यांनी या चित्रपटाची निर्मीती केली आहे.
चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहात आहेत. 18 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटाच्या माध्यमातून महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्ण इतिहासातील आणखी एक सोनेरी अध्याय मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. चित्रपटात छत्रपतींची भूमिका अभिनेता चिन्मय मांडलेकर साकारणार आहे.
‘पावनखिंड’ या चित्रपटात मृणाल कुलकर्णी (Mrinal Kulkarni), चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar), प्राजक्ता माळी, अंकित मोहन, क्षिती जोग, अजय पूरकर समीर धर्माधिकारी आणि शिवराज वायचळ या कलाकारांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
दरम्यान, कोविड रुग्णांचा महाराष्ट्रात पुन्हा झपाट्याने वाढणारा आकडा पाहता काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते. यामध्ये चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे यामधील उपस्थिती देखील 50 टक्के असावी असा नियम करण्यात आला होता.
आता यामध्ये बदल करण्यात यावा अशी मागणी प्राजक्ताने केली आहे. अनेकांनी कोरोनाचा वाढता प्रसार पाहता सिनेमाच्या रिलीज डेट पुढे ढकलल्या आहेत तर काहींनी ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या-
“काय फायली काढायच्या त्या काढा, जेवढं भुंकायचं असेल तेवढं भुंका”
श्रीगोंद्यात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; तीन मित्रांचा जागीच मृत्यू
Tata आहे तर शक्य आहे! ‘या’ दोन गाड्यांनी तोडले सर्व रेकॅार्ड्स
बँक कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निकाल
राष्ट्रवादीला मोठा झटका; मालेगावमध्ये झालेल्या अपमानाचा काँग्रेसने घेतला बदला