मुंबई | एमआयएमला आम्ही 8 जागांची ऑफर दिलीच नाही. आमचं दार त्यांच्यासाठी अजूनही खुलं आहे, असं वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
वचिंतचा जागा वाटपाचा प्रस्ताव मान्य नसल्याने एमआयएम स्वतंत्र लढेल असं एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी सांगितलं होतं. जलील यांची भूमिका हीच पक्षाची अधिकृत भूमिका असल्याचं असदुद्दीन ओवैसींनी स्पष्ट केलं होतं.
वंचितने जागावाटपावर तोडगा काढला तर आमची नव्याने सुरूवात करण्याची तयारी आहे, असं जलील यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं.
असदुद्दीन ओवैसीही आघाडीसाठी तडजोड करण्याबाबत सकारात्मक असल्याची माहीती आहे. वंचित आणि एमआयएमची आघाडी झाल्यास विधानसभा निवडणुकीत ते एकत्र लढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, एमआयएमच्या या निर्णयानंतर वंचितकडून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केले जात आहेत. त्यांच्या मनधरणी यश येतं का हे बघावं लागेल.
महत्वाच्या बातम्या-
पुण्याची ही जागा भाजपकडे…. प्रचार चालू केला शिवसेनेने! https://t.co/XwyuU39Ov8 @ShivSena @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 18, 2019
आरेसंबंधी मेट्रोचे अधिकारी मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करत आहेत; आदित्य ठाकरेंचा बाण https://t.co/LphEG8jZWs @AUThackeray
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 18, 2019
“अमोल कोल्हे संभाजी महाराजांची भूमिका फक्त पैसे मिळवण्यासाठी करत आहेत” https://t.co/1fVYF0W7nh @Madhavbhandari_ @kolhe_amol
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 18, 2019