राज्यापालांच्या वादग्रस्त वक्तव्याला प्रकाश आंबेडकरांचं समर्थन, म्हणाले…

मुंबई | अंधेरीतील एका चौकाच्या उद्घाटनप्रसंगी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना प्रमुख पाहुणे म्हणून पाचारण केले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणात मुंबई बद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते.

मुंबईतील गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढले, तर मुंबईतील पैसा कमी होईल आणि त्यामुळे मुंबईचा आर्थिक राजधानी (Financial Capital of India) असलेला दर्जा देखील जाईल, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले होते.

त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. भाजपच्या काही नेत्यांसह इतर राजकीय पक्षांनी देखील राज्यपालांवर टीका केली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) , मनसेचे राज ठाकरे (Raj Thackeray), राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली.

परंतू वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सर्वांपेक्षा थोडी वेगळी भूमिका घेतली आहे. त्यांनी राज्यपालांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत त्यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे.

राज्यपालांचे विधान चुकीचे नाही. त्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांचे राजकारण उघडे पाडले. राज्यापालांचे वक्तव्य चुकीचे नाही, मी त्यांच्या विधानाचे समर्थन करतो. राज्यपालांच्या वक्तव्याने महाराष्ट्राचा अपमान झाला नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

राज्यपालांच्या दाव्याने राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (INC) पक्षातील प्रस्थापित नेत्यांच्या डोळ्यावरील झापडे उडून गेले आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. राज्यपालांच्या राजीनाम्याच्या मागणीवर बोलताना आंबेडकर म्हणाले, त्यांची उचलबांगडी करण्याची गरज नाही.

राज्यपालांच्या वक्तव्याने महाराष्ट्रातील राजकारण पेटवले असले, तरी राज्यपालांनी आपला मराठी माणसाला दुखावण्याचा हेतू नव्हता असे म्हटले आहे. त्यांनी एक निवेदन दिले त्यात ते महाराष्ट्राची आणि मराठी माणसांची स्तुती करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-