आधी आर. आर. आबा भिडेंना वाचवायचे अन् आता जयंत पाटील वाचवतात; आंबेडकरांचा गंभीर आरोप

मुंबई | राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील आणि शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांचे सलोख्याचे संबंध सर्वश्रूत आहोत. त्यांच्या याच संबंधावर प्रकाश आंबेडकर यांनी बोट ठेवलं आहे. अगोदर आर. आर. पाटील संभाजी भिडेंना वाचवायचे आणि आता जयंत पाटील वाचवत आहेत, असा गंभीर आरोप आंबेडकरांनी केला आहे.

कोरेगाव भीमा हिंसाचाराचा तपास एएनआयकडे सोपवण्याचा निर्णय निषेधार्ह आहे. या प्रकरणाचं सत्य बाहेर येईल, याची भाजपला भिती वाटते म्हणूनच त्यांनी एनआयएकडे तपास सोपववा, असंही आंबेडकर म्हणाले आहेत.

केंद्र सरकारचा राज्य सरकारच्या कामात हस्तक्षेप का होतोय? या दोघांच्या वर्चस्वाच्या लढाईत दुसऱ्यांचा नाहक बळी जातोय, हे लक्षात घेतलं पाहिजे आणि याचीच मला सर्वाधिक चिंता वाटते, असंही आंबेडकर म्हणाले.

दुसरीकडे शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार टीका केली आहे. केंद्र सरकारचे कृत्य संशयास्पद आहे.  भाजपने सत्य बाहेर येण्याच्या भीतीने घाईने NIA कडे तपास सोपवला. अन्यायाविरोधात बोलणं म्हणजे नक्षलवाद नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

“शरद पवारांना आम्ही हनुमानाच्या ठिकाणी मानतो…. ते आमचं दैवत”

ते जास्त पोहे खात होते म्हणून बांगलादेशी; भाजप नेत्याचं अजब तर्कट

“सेना-भाजपद्वेषाचं मूळव्याध दुसऱ्या मार्गातून बाहेर येत आहे”

“राजसाहेबांनी बोट ठेवल्यामुळे झालेले जुलाब सामन्याच्या अग्रलेखातून बाहेर पडत्यात”