औरंगाबाद महाराष्ट्र

प्रकाश आंबेडकर 2019 साली मुख्यमंत्री आणि 2024 साली पंतप्रधान होतील!

सोलापूर : 2019 मध्ये आपल्याला प्रकाश आंबेडकरांना मुख्यमंत्री करायचं आहे आणि मला अर्थमंत्री व्हायचं आहे, असं मत माजी आमदार लक्ष्मण माने यांनी व्यक्त केलं. ते सोलापुरातील सभेत बोलत होते.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोलापुरात सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सभेला कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती. तसंच 2019 ला प्रकाश आंबेडकर हे मुख्यमंत्री होतील आणि 2024 ला पंतप्रधान होतील, असा दावाही त्यांनी केला.

दरम्यान, आमची सत्ता आल्यास एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. मोफत शिक्षण दिले जाईल. सर्वांना रोजगार दिला जाईल, असंही ते म्हणाले.

IMPIMP