महाराष्ट्र मुंबई

प्रकाश आंबेडकर विधानसभा निवडणूक ‘या’ चिन्हावर लढणार!

मुंबई : वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकांवेळी राज्यात धुमाकूळ घातला होता. राज्यातील जवळपास सर्वच मतदारसंघात आपला उमेदवार उभा करुन बहुतांश मते मिळविण्यात वंचित बहुजन आघाडीला यश आलं आहे. अनेक ठिकाणी प्रतिस्पर्धी उमेदवारांची डोकेदुखी ठरण्याचं काम वंचित बहुजन आघाडीने केलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने वंचितने तयारी सुरू केली आहे.

लोकसभा निवडणुकांवेळी ‘कपबशी’ या चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला आता निवडणूक आयोगाकडून आता वेगळं चिन्ह देण्यात आलं आहे. वंचितला ‘गॅस सिलेंडर’ हे चिन्हे दिले आहे.

संभाजी ब्रिगेडला ‘शिलाई मशिन’ हे चिन्ह दिले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये वंचितचे चिन्ह ‘गॅस सिलेंडर’ हे असणार आहे.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बहुतांश पराभवाला वंचित बहुजन आघाडी कारणीभूत ठरली आहे. त्यामुळेच, वंचित बहुजन आघाडीला भाजपची बी टीम म्हणूनही हिनवले जाते. बहुजन भारिप महासंघाचे प्रमुख बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएम पक्षाशी हातमिळवणी केल्यानंतर वंचित बहुजन आघाडी हा पक्ष स्थापन केला. 

दरम्यान, अगदी कमी कालावधीत आपलं नाव मोठं करणाऱ्या या पक्षाने आता विधानसभा निवडणुकांची तयारीही सुरू केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-1998 नंतर राष्ट्रकुल स्पर्धेत पहिल्यांदाच खेळले जाणार क्रिकेट; आयसीसीची घोषणा

-…म्हणून ग्रामीण भागात 10 हजार तर शहरात 15 हजार रुपयांची मदत करणार- मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

-पूरग्रस्त आणखी सावरले नाहीत अन् भाजप म्हणतंय मुख्यमंत्र्यांना राख्या पाठवा!

-“तू आम्हाला प्रत्येक क्षणी आठवतेस…आणि तू आमच्या सोबत अनंत काळापर्यंत राहशील”

-मराठमोळ्या क्रिकेटपटूची पूरग्रस्तांसाना मदत; इतरांनाही केलं मदतीचं आवाहन!

IMPIMP