महाराष्ट्र मुंबई

परदेशातील भारतीयांना विमानातून फुकट आणलं, मग स्थलांतरित कामगारांकडूनच पैसे का?- प्रकाश आंबेडकर

मुंबई | परदेशातील भारतीयांना विमानातून फुकट आणलं, मग स्थलांतरित कामगारांकडून पैसे का? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. स्थलांतरित कामगारांकडून तिकिटाचे पैसे घेण्याच्या मुद्द्यावरुन प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे.

गावी जाणाऱ्या स्थलांतरित कामगारांकडून रेल्वे किंवा बसच्या तिकिटाचे पैसे आकारु नये, अशी मागणी आंबेडकरांनी केली आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघेही स्थलांतरित कामगारांबाबत भेदभाव करत असल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकरांनी केला.

केंद्र सरकार असो की राज्य सरकार दोघांनीही स्थलांतरित कामगारांशी भेदभाव करायचं असं ठरवलं आहे. विदेशात अडकलेल्या भारतीयांना विमानातून घेऊन आले. त्यांना कुठल्याही प्रकारचं भाडं भरायला लावलं नाही. मात्र आता स्थलांतरित कामगारांना त्यांच्या गावी नेताना रेल्वे किंवा बससाठी तिकिट लावलं जातं आहे. हा सरकारकडून सुरु असलेला भेदभाव आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

दरम्यान, सरकारने तातडीने हा निर्णय बदलवावा. जसं विमानातून घेऊन येणाऱ्यांकडून कोणतंही भाडं घेतलं नाही, त्यांना मोफत घेऊन आलात तसंच गावी जाणाऱ्या स्थलांतरित कामगारांकडून रेल्वे किंवा बसचं तिकिट मागू नये, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

 

महत्वाच्या बातम्या-

-रिंकू राजगुरुनं शेअर केला हॉट लूक; लाईक करायला उडाली चाहत्यांची झुंबड

-उद्धव ठाकरेंसह शिवसेनेकडून विधानपरिषदेचा दुसरा उमेदवारही निश्चित

-‘मजुरांना विनामूल्य रेल्वेसेवा द्या’; रितेश देशमुखनं शेअर केला मन सुन्न करणारा फोटो

-‘नैतिकतेच्या मुद्द्यावर तुम्ही इतिहासजमा झाला आहात’; आशिष शेलारांची शिवसेनेवर टीका

-पिठाच्या पिशव्यांमधून गरिबांना खरंच 15 हजार रुपये वाटले का?; आमिर खाननं स्वतः केला खुलासा