पश्चिम महाराष्ट्र पूरात असताना मुख्यमंत्री ‘महाजनादेश’ यात्रेत मग्न- प्रकाश आंबेडकर

सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हापूर, सांगलीतील पूरग्रस्तांना मदत करण्याऐवजी स्वत:ची ‘महाजनादेश’ यात्रा करण्यात मग्न झाले आहेत, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. कर्नाटकमधील अलमट्टी धरणाची उंची आणि त्यामुळे निर्माण झालेली पूरपरस्थितीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष द्यायला वेळ नाही, अशी टिकाही प्रकाश आंबेडकरांनी फडणवीस यांच्यावर केली.

हेलिकॉप्टर केवळ मंत्र्यांच्या दौऱ्यासाठी वापरली गेले होते. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी वापरली गेली नाहीत. मुख्यमंत्री कोल्हापुरात राहिले असते तर प्रशासन गतिमान झालं असतं, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांवर केली. 

केरळ सरकारने पूरग्रस्तांच्या सुटकेसाठी मच्छीमारांचा वापर केला होता, तशी कल्पकता फडणवीस सरकारला दाखवता आली नाही, असे आंबेडकर म्हणाले.

कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील पाणी ओसरण्यास काही दिवस लागणार आहेत. महापुरामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झालेत. त्यामुळे पूरग्रस्तांना संसारोपयोगी साहित्याची मदत करावी, असे आवाहन वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जनतेला केले.

दरम्यान, वंचित आघाडी मुंबई, कोल्हापूर, सांगलीत मदतीसाठी संकलन केंद्र उभारणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. 

पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूरमधील नागरिकांचं जनजीवन विस्कळित झालं आहे. या महापूराचा सर्वसामान्यांना चांगलाच फटका बसला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-धैर्यशील माने यांची पूरग्रस्तांना मदत; उचलली पाठीवर पोती

-ऑलिम्पिक पात्र खेळाडूंना 50 लाखांचं अर्थसहाय्य- आशिष शेलार

-सावत्र वडिलांनी केलेल्या छळानंतर श्वेता तिवारीची मुलगी म्हणते…

-“मी विमान पाठवतो, तुम्ही स्वत: या आणि काश्मीरमधील परिस्थिती बघा”

-बालपणापासूनच्या ते गेल्या 18 वर्षापर्यंत मोदींनी सांगितल्या ‘या’ सगळ्या गोष्टी