मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोहिनूर मिल खरेदी प्रकरणी अंमलबजावणी संचलनालय म्हणजेच ईडीची नोटीस आली आहे. राज ठाकरेंना ईडीची नोटीस येणार नाही, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करा अस मनसे नेते बाळा नांदगावकर यांना 10 दिवसांपूर्वीच सांगितलं होतं. त्यांनी तो प्रयत्न केला की नाही ते मला माहित नाही, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलाय.
कोहिनूर मिल खरेदीप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे सुपुत्र उन्मेष जोशी यांना ईडीने नोटीस बजावली आहे. उन्मेष जोशींना आज तर राज ठाकरे यांनी येत्या गुरुवारी म्हणजे 22 ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
भाजपकडून ब्लॅकमेलिंगचं राजकारण केलं जात असल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला. आणखी जे पक्षात जाणार नाहीत, त्यांनाही असाच त्रास सुरु केला जाणार आहे. ब्लॅकमेलिंगचं राजकारण केलं जातंय. पण राज ठाकरे याला बळी पडतील, असं मला वाटत नाही, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
कोहिनूर सीटीएनएल ही उन्मेष जोशी यांच्या मालकीची कंपनी आहे. उन्मेष जोशी, राज ठाकरे आणि त्यांचे निकटवर्तीय राजन शिरोडकर हे 2008 पर्यंत ‘कोहिनूर कंपनीचे शेअर होल्डर होते. त्यांनी कोहिनूर मिल नंबर 3 ही जागा 2003 मध्ये लिलाव पद्धतीने 421 कोटींना खरेदी केली होती.
महत्वाच्या बातम्या-
-मुख्यमंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा फडणवीसांवर आरोप; कठोर कारवाईची मागणी
-पूरग्रस्तांना दिलासा; सरकारकडून ‘या’ महत्वाच्या घोषणा
-पवारसाहेब, सोडून द्या! कावळेच ते!; ‘सामना’तून शरद पवारांवर टीका
-गिरीश महाजनला जोड्यानं हाणलं पाहिजे; धनंजय मुंडेंची एकेरी शब्दात टीका
-सहाय्यक पोलीस निरीक्षकाची पोलीस मुख्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या