अयोध्या निकाल हा तथ्य आणि पुराव्यांवर नाही तर…-प्रकाश आंबेडकर

मुंबई | जगात भारतीयांकडे संशयीत नजरेने पाहिलं जातं पण याबाबत कोणताही भारतीय स्वत:ला विचारत नाही की आमच्यावर अत्याचार झाले असताना आता जगही आमच्यावर अत्याचार करत आहे. परंतू हे एक सत्य आङे की वैदिक धर्म मानणारे लोक हे दुसऱ्या धर्माच्या अतिक्रमण करत आहेत आणि हे सध्या अयोध्येत होत आहे पुरावे व इतिहासाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर अयोध्या हे बौद्धांचे सांस्कृतिक शहर होते. मात्र निकाल हा तथ्यांवर नसून भावनिकतेवर देण्यात आला, असं वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर  यांनी म्हटलं आहे.

अलाहाबाद ( प्रयागराज ) उच्च न्यायालयात प्रकरण गेले तेव्हा हा निकाल तथ्यांवर नाही तर भावनांवर झाला. परिणामी निकाल राम मंदिराच्या बाजूने लागला. सर्वोच्च न्यायालयातही इतिहासाला व पुराव्यांना ग्राहय धरले नाही, यातून एक मार्ग काढला जात आहे असं सांगत राम मंदिराच्या बाजूने निकाल दिला असल्याचं आंबेडकर म्हणाले.

अलाहाबाद न्यायालयाने हे मान्य केले असते की अयोध्या ही पूर्वी साकेत नावाने ओळखली जात होती. या ठिकाणी केलेल्या खोदकामात जे सापडले ते बौद्ध अवशेष आहे. पण चालूची परिस्थिती पाहता तिथे राम मंदिर उभारण्याची गरज आहे, असं न्यायालयाने सांगितलं असतं तर भारतीयांकडे संशयाच्या पाहणं कमी झालं असतं, असंही आंबोडकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राम मंदिराचं भूमिपूजन हे उद्या असून अयोध्या नगरी चांगली सजली आहे.

महत्वाच्या बातम्या-

“राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त अशुभ असल्यामु्ळे भूमिपूजनाअगोदर भाजप नेत्यांना कोरोनाची लागण होत आहे”

कोरोनाच्या लसीवरून WHO प्रमुखांनी केलेल्या ‘या’ वक्तव्यामुळे जगाचं टेन्शन वाढलं; वाचा काय म्हणाले…

गृहमंत्री अमित शहांची तब्येत बरेहोईपर्यंत भाजपचा ‘हा’ नेता ठेवणार रोजा

विकृतीचा कळस! चिमुरडीला पॉर्न दाखवत नराधमानं केला बलात्कार, अन् मग गावकऱ्यांनी उचललं ‘हे’ पाऊल

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येबाबत निलेश राणेंचा सरकारचा गंभीर आरोप; जस दिवस जात आहेत तसे…