शिवसेनेचा पोपट होऊ नये एवढीच इच्छा- प्रकाश आंबेडकर

मुंबई | काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन सत्तास्थापन करणार आहे. सत्तेसाठी हे तिन्ही पक्ष एकत्र येत आहेत. मात्र, यात शिवसेनेचा पोपट होऊ नये एवढीच इच्छा आहे, असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी टोला लगावला आहे.

गेल्या 26 दिवसांपासून महाराष्ट्रात नाटक सुरु आहे. शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बिनबुडाचा आहे. तो कोणत्याही बाजूने जाऊ शकतो, असं म्हणत आंबेडकरांनी टीका केली आहे. त्यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला आहे.

मुंबई केंद्रशासित प्रदेश, विदर्भ वेगळे राज्य आणि उर्वरित महाराष्ट्राचे एक राज्य असे महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे. यासाठी केंद्रातील सरकारला राज्यात राष्ट्रपती राजवट हवी आहे, असा आरोप करत आंबेडकरांनी भाजपवर टीका केली आहे.

अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र, सरकार याकडे गांभीर्याने पाहात नाही. राज्यात काही दिवसांपासून नाटक सुरु आहे, असंही आंबेडकर म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-