मुंबई | राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत महत्वाचा ठराव मंजूर करण्यात आला. देशातील सध्याच्या कठीण राजकीय परिस्थितीत शरद पवार यांनीच काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्षांचे नेतृत्व करावं, असा प्रस्ताव बैठकीत मांडण्यात आला.
काँग्रेस नेतृत्व करु शकत नाही, असं राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं म्हणणं आहे. शरद पवारच देशातील विरोधकांना एकत्र आणू शकतात आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजपला रोखलं जाऊ शकतं, असं या ठरावात म्हटलं आहे.
या ठरावानंतर आता काँग्रेस आणि युपीएतील घटक पक्ष काय भूमिका घेतात देतात याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. आता यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यूपीएचं नेतृत्व बदलायचं असेल तर ममता बॅनर्जींशिवाय दुसरी कोणतीही योग्य व्यक्ती दिसत नाही असं, प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.
ममता बॅनर्जींशिवाय यूपीएला इतर विश्वासार्ह पर्याय नाही, असंही प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही भाजपा विरोधी पक्षाच्या नेत्यांना आणि मुख्यमंत्र्यांना उद्देशून एक पत्र लिहिलं आहे. यात भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असून लोकशाहीच्या तत्वांची हत्या केली जात असल्याचा आरोप बॅनर्जी यांनी पत्रात केलाय.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या वर्षी कोरोनाची साथ….’; WHO प्रमुखांच्या वक्तव्याने टेंशन वाढलं
Petrol Diesel Prices Today | आज पुन्हा ‘इतक्या’ रूपयांनी पेट्रोल-डिझेल महागलं
समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता द्या- सुप्रिया सुळे
सर्वात मोठी बातमी! मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणातील पंच प्रभाकर साईलचा मृत्यू
‘या’ शेअरमुळे गुंतवणूदार बनले कोट्यधीश; लाखाचे झाले ‘इतके’ कोटी