“शिवाजी पार्क हे शिवाजी पार्कच राहु द्या, त्याची स्मशानभूमी करु नका”

मुंबई | गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं रविवारी निधन झालं. निधनानंतर दिवसही लोटला नाही तोच त्यांच्या स्मारकावरुन राजकारणाला सुरुवात झाली आहे. आता या शिवाजी पार्कची स्मशानभूमी करु नका असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

मैदानावर खेळ खेळले जावेत, स्मारकाकरता इतर अनेक जागा आहेत असंही प्रकाश आंबेडकर म्हणालेत. लतादीदींचं स्मारक शिवाजी पार्कमध्ये करा अशी मागणी भाजपनं केली आहे. यावर बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

शिवाजी पार्कवर केल्या जात असलेल्या अंत्यसंस्कारावरुनही प्रकाश आंबेडकर यांनी निशाणा साधलाय. मैदानावर खेळ खेळले जावे जावेत, स्मारकाकरता इतर अनेक जागा आहेत, खेळाच्या जागी अतिक्रमण करु नये, असं त्यांनी म्हटलंय.

सोबतच शिवाजी पार्क हे शिवाजी पार्कच रहावं, त्याची स्मशानभूमी करु नये, असाही टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे. तसंच सोशल मीडियावर लोकांनी ट्रोल करण्याचं घाणेरडं काम करणाऱ्यांचाही प्रकाश आंबेडकर यांनी निषेध नोंदवलाय.

रविवारी लता मंगेशकर यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर दिग्गजांनी लता मंगेशकर यांच्या गाण्याचं (Lata Mangeshkar Songs), त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदाराचं भरभरुन कौतुक करत त्यांना आदरांजली वाहिली होती. प्रकाश आंबेडकर यांनी देखील लता मंगेशकर यांचं कौतुक करत त्यांना आंदरांजली वाहिली आहे.

दरम्यान, शाहरुख खानच्या फुंकरवरुनही त्याला ट्रोल करणाऱ्यांना प्रकाश आंबेडकर यांनी प्रत्युत्तर दिलंय. त्यांनी म्हटलंय की, मी मुस्लिम व्यक्तींच्या प्रेतयात्रेला मी गेलोय, असं त्यांनी सांगितलं.

मी बघितलंय की अनेक ठिकाणी फुंकर घातली जाते. हे देशाचं वैविध्यपूर्ण कल्चर आहे. ते स्वीकारायलाच हवं! ज्यांना पटत नसेल त्यांनी शांत रहावं, असा सल्लाही प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या- 

‘कहाँ से आया मे हू डॉन…’, भाचीच्या लग्नात धनंजय मुंडे बेभान होऊन नाचले, व्हिडीओ व्हायरल 

“भविष्यात सर्व हिशोब चुकते होणार, तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी…” 

महाराष्ट्र कोरोनामुक्त होतोय! जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?; ठाण्यातील पोस्टरची राज्यभर चर्चा

 “तुम्ही मोठं पाप केलंय”; संसदेत नरेंद्र मोदींचे ठाकरे सरकारवर गंभीर आरोप