Top news

“पोलिसांनी राज ठाकरे यांना बेड्या ठोकाव्यात”

Raj Thackeray 00

मुंबई | राज यांनी मशिदीवरील भोंग्यांना हनुमान चालिसाने उत्तर देण्याची भाषा केल्याने अनेकांनी धार्मिक तेढ निर्माण करु नका, असं म्हणत राज यांना सुनावलं आहे. आता, वंचित बहुजन आघाडीने राज यांचं भाषण पोलिसांनी गांभीर्याने घेण्याचं सूचवलं आहे.

राज यांनी आपल्या भाषणात मुंबईतील काही भागांचा उल्लेख केला. त्यात, मुब्रा परिसरातील मशिदींवर ईडीने धाडी टाकाव्यात, असंही म्हटलं. मदरसे आणि मशिंदींमध्ये समाजविघातक कृत्य घडत आहेत.

राज ठाकरेंच्या वक्तव्यात तथ्य असेल तर महाराष्ट्र पोलिसांनी मशिदी सील कराव्यात, पण जर राज ठाकरेंच्या विधानात तथ्य आढळून आलं नाही तर त्यांना युएपीए कायद्यांतर्गत पोलिसांनी बेड्या ठोकाव्यात, अशी सडेतोड भूमिका वंचितने घेतली आहे.

आपल्याला कशाला हवाय पाकिस्तान असं म्हणत राज यांनी मुंबईतील विशिष्ट समुदायाला लक्ष्य केलं. राज यांच्या या विधानानंतर राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून वंचित बहुजन आघाडीने राज ठाकरेंचं भाषण गंभीरतेनं घेण्याचं सूचवलं आहे.

राज ठाकरेंच्या वक्तव्याला पूर्णपणे पाठिंबा आहे. पण त्याआधी अमित ठाकरेंनी हनुमान चालीसा म्हणून दाखवावी”, असं सुजात आंबेडकर म्हणाले आहेत. यासोबत राज यांच्यावर टीका सुजात यांनी केली.

माझी राजसाहेबांना विनंती आहे की तुम्ही शरद पवारांचा इंटरव्ह्यू घ्या किंवा मग स्वत: पक्ष भाड्यानं लावून दुसऱ्याच्या प्रचाराला फिरा. पण तुमचा संपलेला पक्ष हिंदू-मुस्लीम दंगलीवर उभा करू नका, असंही सुजात आंबेडकर म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

अत्यंत धक्कादायक घटना; पत्नीच्या हट्टासाठी आईला नदीत फेकलं 

“कोरोना काळात पुण्याला कोण पळून गेलं हे सगळ्यांना माहिती” 

Corona: महाराष्ट्र कोरोनामुक्त होतोय! वाचा राज्याची आजची ताजी आकडेवारी

Amit Shah: “…तेव्हा मला राग येतो”, गृहमंत्री अमित शहांचा संसदेत खुलासा

“राज ठाकरेंंना माझी हात जोडून विनंती आहे की…”