महाराष्ट्र मुंबई

काँग्रेससोबत आघाडीसाठी तयार पण…; प्रकाश आंबेडकरांनी घातली ‘ही’ अट!

मुंबई : लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरं जाव लागल्याने काँग्रेसकडून आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचे प्रयत्न केले जात असल्याचं दिसत आहेत.

वंचित बहुजन आघाडी आमच्यासोबत येण्यास तयार आहे, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला होता. आता यानंतर वंचितनेही काँग्रेससोबत जाण्याची तयारी दाखवली आहे. 

वंचितने काँग्रेससोबत आघाडीसाठी तयार असल्याचं म्हटलं आहे. मात्र आघाडीत राष्ट्रवादी नसेल तरच विधानसभेला तुमच्यासोबत येणार, अशी अशक्यप्राय अट वंचितने काँग्रेससमोर ठेवल्याचं कळतंय.

विधानसभेला काँग्रेसने राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्यास वंचित आघाडीत सहभागी होणार नसल्याचं समजतंय. वंचितच्या या अटीमुळे विधानसभा निवडणुकीत आघाडीमध्ये वंचितचा समावेश होणार नसल्याचं दिसत आहे. 

प्रकाश आंबेडकरांनी स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचे संकेत देत काँग्रेस-राष्ट्रवादीला 30 जुलैपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. 

आघाडीचा निर्णय न झाल्यास 30 जुलैला वंचित विधानसभेच्या उमेदवारांची पहिली स्वतंत्र यादी जाहीर करेल, असा इशारा वंचितने दिला आहे. 

महत्वाच्या बातम्या-

आदित्य ठाकरेंमध्ये शिवाजी महाराजांची झलक पाहणारा विद्यार्थी नव्हे तर शिवसैनिक!

-अण्णा हजारेंचा इशारा; मोदी सरकारविरोधात आंदोलन करणार!

-चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात दोन महिला पदाधिकाऱ्यांचा विनयभंग

-खासदार डॉ. अमोल कोल्हेंवर राष्ट्रवादी मोठी जबाबदारी टाकणार!

-कार्यकर्त्याला भाषणादरम्यान अश्रू अनावर ; धनंजय मुंडेंनी दिला धीर

IMPIMP