“बिचारे देवेंद्र फडणवीस…, केंद्राने त्यांचा शंकरराव चव्हाण केला”

मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये आपण सहभागी होणार नसल्याचे सांगून काही वेळ जात नाही तोच त्यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचे निर्देश भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिले. यानंतर फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

मुख्यमंत्री पदावर काम करणारे फडणवीस आता उपमुख्यमंत्री झाले आहेत. यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावला आहे.

बिचारे देवेंद्र फडणवीस, देवेद्र फडणवीस यांचा केंद्रातील नेतृत्वाने शंकरराव चव्हाण केला, असं खोचक ट्विट प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे.

दरम्यान,एकेकाळी मुख्यमंत्री म्हणून काम करणारे शंकरराव चव्हाणांनी शरद पवार मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्या काळात मंत्री म्हणून काम केलं होतं. याचाच संदर्भ देत आंबेडकरांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे.

चंद्रकांत पाटील हे अमित शाह यांच्या जवळचे आहेत. मागच्या सरकारमध्ये चंद्रकांत पाटील हे उपमुख्यमंत्र्यासारखेच वागले.एकनाथ शिंदे यांना नियंत्रणात ठेवायचं होतं तर ते चंद्रकांत पाटीलही करू शकले असते. देवेंद्र फडणवीसांचा बळी का?, असा प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी ट्विटरवरुन विचारला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘तुमच्यामुळे देशाची बदनामी झाली, टीव्हीवर जाऊन देशाची माफी मागा’; नुपूर शर्मांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं 

पुढचे 5 दिवस महत्त्वाचे; ‘या’ भागांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी 

सत्तेत येताच शिंदे-फडणवीसांचा ठाकरेंना धक्का; ‘या’ दोन निर्णयात बदल 

…तर मी देवेंद्र फडणवीसांना शाबासकी दिली असती- शरद पवार 

सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रात सत्तांतर होताच शरद पवारांना धक्का