मुंबई | कर्नाटकमध्ये सुरू असलेला हिजाब (Hijab) वाद वाढतच चालला आहे. कर्नाटक सरकारच्या आदेशाला आव्हान देत मुस्लिम विद्यार्थिनींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. त्यावर कोर्टातही सुनावणी सुरू आहेत.
कर्नाटक सरकारने आदेश दिले आहेत की विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांनी ठरवून दिलेला गणवेश परिधान करावा. यावरूनच हा वाद पेटला आहे. हिजाब घालून घोषणाबाजी करणारी मुस्कानही देशातल्या घराघरात पोहोचली आहे, महाराष्ट्रातही यावरून राज्यभर आंदोलनं झाली.
याच वादात आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उडी घेतली आहे. त्यांनी हिजाबच्या समर्थनार्थ कोर्टाला विनंती केली आहे. एवढंच नाही तर त्यांनी संविधान आणि कायद्याचाही दाखला दिला आहे.
आम्ही न्यायालयाला विनंती करतो की, ड्रेस कोडबाबत घटनेत किंवा कायद्यात कोणतीही तरतूद नाही यावर त्वरित निर्णय घ्यावा. लोकांना हवे ते परिधान करण्याचा मूलभूत अधिकार आहे, असं ते म्हणालेत.
सरकारने याची अंमलबजावणी करावी. हा निर्णय आला तर समाजात शांतता नांदेल, शांतता नांदेल, असं मला वाटतं, आशा आशयाचं ट्विट आंबेडकरांनी केलं आहे.
या प्रकरणाचा निकाल येईपर्यंत शिक्षण संस्थांमध्ये धार्मिक पोशाखावर कर्नाटक उच्च न्यायालयाकडून बंदी घालण्यात आली आहे. तसंच सर्व शिक्षण संस्था सुरु करा असे निर्देशही उच्च न्यायालयाने दिले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
“काँग्रेसला वगळून मोदींविरोधातली लढाई यशस्वी होणार नाही”
दिलासादायक! कोरोना रुग्णांच्या संख्येत ‘इतक्या’ पटीनं घट, वाचा आजची आकडेवारी
“तिसऱ्या आघाडीनं काहीही फरक पडत नाही, येणार तर मोदीच”
“देशातील परिवर्तनच्या लढ्यासाठी शरद पवारांनी पुढाकार घ्यावा”