शिंदे-भाजप युतीबाबत प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या ट्विटमुळे मोठी खळबळ

मुंबई | सरकार स्थापन करण्यासाठी भाजपमध्ये विलिनीकरण होण्याची अट शिंदे गटासमोर ठेवलीय का? असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या गटाने भाजपमध्ये विलीन व्हावं आणि मगच सरकार स्थापन होईल अशी अट भाजपने एकनाथ शिंदेंना घातली आहे?, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेत सर्वात मोठं बंड करून ठाकरे सरकारला हादरा दिल्यानंतर आता भाजप आणि एकनाथ शिंदे गट यांचं एकत्र सरकार स्थापन करण्याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत.

एकनाथ शिंदेंना भाजपकडून उपमुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. भाजपला आता एकनाथ शिंदे यांच्या उत्तराची प्रतीक्षा आहे.

दरम्यान, प्रकाश आंबेडकरांच्या ट्विट वर भाजपने प्रतिक्रिया दिली आहे. काश आंबेडकर काय बोलतात याचा भाजपशी काही संबंध नाही. याआधीही त्यांनी अशी अनेकदा चित्रविचित्र वक्तव्य केलेली आहेत. शिवसेनेत सध्या जे काही सुरु आहे तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, त्याच्याशी भाजपचा काही संबंध नाही, असंही भातखळकर म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘तुम्ही ठरवा, आता शिवसेनेची जबाबदारी तुमची’; आमदारांमधील संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल 

उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडताच सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीस ट्रोल! 

“आमचा विठ्ठल चांगला, अवतीभवतीच्या बडव्यांमुळे आमचा विठ्ठल बदनाम होतोय” 

मोठी बातमी! मुंबईत उद्धव ठाकरेंच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल 

“हे वादळ दोन दिवसात शांत होईल, सरकार पडणार नाही, आमदारही परत येतील”