ठाकरे बंधुंच्या नातेवाईकांकडूनच नाणारमधील जमिनींची खरेदी; भाजपच्या माजी आमदाराचा दावा

रत्नागिरी |  नाणार प्रकल्पाला शिवसेनेकडून जोरदार विरोध होत आहे. भाजपचे माजी आमदार तसंच भाजप सिंधुदूर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी नाणार प्रकरणावरून ठाकरे कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत.

नाणार रिफायनरीला आमचा विरोधच आहे आणि हा प्रकल्प इथे कदापि होऊ देणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इथे येऊन सांगून गेले. पण याच ठाकरे बंधुंच्या नातेवाईकांनी नाणारला लागणारी जमीन खरेदी केली आहे. हिंमत असेल तर या पुरावे दाखवतो, असं प्रमोद जठार यांनी म्हटलं आहे.

जठार यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचंही अप्रत्यक्षपणे नाव घेतलं आहे. मात्र नाणार रिफायनरीचा विषय संपलेला आहे, काही झालं तरी नाणार प्रकल्प होणार नाही, अशी भूमिका खासदार विनायक राऊत यांनी स्पष्ट केली आहे.

दरम्यान, शिवसेनेचा गमछा किंवा झेंडा घेऊन कोणी शिवसैनिक रिफायनरीला पाठिंबा देईल त्याची गय केली जाणार नाही, असा इशाराही राऊत यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-मलाही संसार आहे लेकांनो… व्हीडिओ काढताना जरा विचार करा- इंदुरीकर महाराज

-मोदी सरकारने कांद्यावरची निर्यातबंदी उठवली; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण

-नियुक्त्या रद्द करण्याचा ठाकरे सरकारचा धडका सुरूच; ‘या बड्या’ नेत्याची नियुक्ती रद्द

-अ‌ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर हर्षवर्धन जाधवांचा शिवसेनेवर हल्लाबोल; म्हणाले….

-….म्हणून अजित पवारांना भर सभागृहात मागावी लागली माफी!