Top news महाराष्ट्र

‘देऊळबंद’ चित्रपटाचे दिग्दर्शक प्रणीत कुलकर्णी यांचं निधन

मुंबई| देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार अतिशय वेगाने झाला आहे. यामुळे रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली असून त्याचा सर्व ताण देशातील आरोग्य यंत्रणेवर आला आहे. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकार त्यांच्यापरीने प्रयत्न करत आहेत.

मागील वर्षापासून आपण कोरोनासोबत जगत आहोत, त्याला संपवण्यासाठी लढत आहोत. कोरोनाच्या दुस-या लाटेने तर मृत्युचे तांडवच चालवले आहे.

अशातच मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध गीतकार ,लेखक आणि दिग्दर्शक प्रणीत कुलकर्णी यांचं निधन झालं आहे. प्रणीत कुलकर्णी यांच्या निधनाबद्दल अभिनेते प्रविण तरडे यांनी फेसबुक पोस्ट करत माहिती दिली आहे.

प्रणित कुलकर्णी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यांची कोरोना विरुद्धची झुंज अखेर अपयशी ठरली. प्रणित कुलकर्णी यांचं निधन झालं.

देऊळबंद सिनेमाचे दिग्दर्शक प्रणित कुलकर्णी यांची कोरोनाविरुद्धची झुंज अखेर अपयशी ठरली. प्रणित कुलकर्णी यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. त्यांच्या निधनामुळे मराठी मनोरंजन विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांना अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे.

प्रणित कुलकर्णी यांच्या निधनानंतर दिग्दर्शक आणि लेखक प्रविण तरडे यांनी सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर केली आहे. माझा प्रणित दादा गेला .. सरस्वती प्रसन्न असलेला शब्दप्रभु हरपला .. गीतकार, लेखक ,दिग्दर्शक प्रणीत कुलकर्णी बद्दल लिहायला लागलो तर दिवस पुरायचा नाही .. नंतर सविस्तर लिहिलच .. देवूळबंद ला माझ्या सोबत लेखन दिग्दर्शन आणि देऊळबंद , मुळशी पॅटर्न , सरसेनापती हंबीरराव चा गीतकार . अ रा रा खतरनाक , उन उन वठातून , आभाळा आभाळा , गुरूचरीत्राचे कर पारायण, हंबीर तु खंबीर तु अशी एका पेक्षा एक गाणी लिहून प्रणीतदादा गेला .. कायमचा .. अशा शब्दांत प्रविण तरडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

प्रविण तरडे आणि प्रणीत यांची खूप जुनी मैत्री होती. फिरोदिया करंडक स्पर्धा गाजवून प्रणित कुलकर्णी यांचा कलाक्षेत्रातील प्रवास सुरू झाला. त्यानंतर त्यांनी गीतलेखन आणि ऑल द बेस्ट या टीव्ही मालिकेचे लेखन दिग्दर्शन केलं होतं. तसेच लोकप्रिय झालेल्या ‘लक्ष्य’ या मालिकेचंही लेखक होतेे.

गीतकार आणि म्युझिक अल्बमचा निर्माता म्हणून प्रणित यांनी बराच काळ काम केलं आहे. प्रविण तरडे आणि प्रणीत यांना सर्जनशील निर्मिती करण्याच्या वेडानं दोघांनी देऊळबंद हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. सिनेमाचं लेखनही त्यांनी मिळूनच केलं होतं.

महत्वाच्या बातम्या – 

सॅनिटायझरच्या चुकीच्या वापरामुळे कारला लागली आग…

हौसेनं गेली पोल डान्स करायला अन्…, पाहा व्हायरल…

‘मेरे रश्के कमर…’, तरूणाचा…

10 वर्षाच्या चिमुकलीचा ‘हा’ व्हिडीओ पाहून…

गाडी चालवताना अचानक समोर आला भलामोठा हत्ती अन्…, पाहा…