भाजप नेत्यांमध्ये लेटर वाॅर; एकाचा भ्रष्टाचाराचा आरोप, तर दुसऱ्याकडून ब्लॅकमेलरची उपाधी

औरंगाबाद | सत्तेपासून दूर गेलेल्या भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येताना दिसत आहे. भाजप नेत्यांमध्ये आता एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपास सुरुवात झाली आहे. औरंगाबादमधील गंगापूर विधानसभा मतदारसंघातील आमदार प्रशांत बंब आणि नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यात लेटर वाॅर झडत असल्याचं उघड झालं आहे.

प्रशांत बंब यांनी चिखलीकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत, तर चिखलीकर यांनी बंब यांना ब्लॅकमेलर असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या या आरोप-प्रत्यारोपांच्या फेरीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत.

प्रशांत बंब यांनी नांदेडमधील काही कामात भ्रष्टाचार झाल्याचं म्हटलं आहे. तसेच भ्रष्टाचार उघड होऊ नये यासाठी माझ्यावर दबाव आणला जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. यावर चिखलीकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र लिहून दखल न घेण्याची विनंती केली आहे. तसेच बंब हे ब्लॅकमेलर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

प्रशांत बंब यांनी चिखलीकरांना पत्र लिहून प्रत्युत्तर दिलं आहे. जर कुठे निकृष्ट काम होत असेल तर त्याबाबत तक्रार करण्याचा मला अधिकार आहे. रस्त्याच्या कामातील भ्रष्टाचाराबाबत चिखलीकर गप्प का आहेत?, असा सवाल बंब यांनी केला आहे. त्यामुळे भाजप खासदार आणि आमदारात लेटर वाॅर रंगलं आहे.

Political fighting of BJP leaders, भाजप खासदार आणि आमदारात लेटर वॉर, एकाकडून ब्लॅकमेलरची उपाधी, तर दुसऱ्याकडून भ्रष्टाचाराचे आरोप

महत्वाच्या बातम्या-