नवी दिल्ली | गेल्या महिन्यात बिहार (Bihar) आणि महाराष्ट्र (Maharashtra) या देशातील दोन मोठ्या आणि महत्वाच्या राज्यांमध्ये राजकीय उलथापालथ झाली. दोन्ही राज्यांत मोठे राजकीय बदल देखील घडून आले.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार (MVA) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे पडले आणि भाजपसोबत शिंदे यांच्या गटाचे सरकार स्थापन झाले, तर दुसरीकडे बिहारमध्ये नितीश कुमारांनी (Nitish Kumar) भाजपसोबतच्या आघाडीतून माघार घेतली.
कुमारांनी भाजपसोबतची आघाडी तोडत काँग्रेस (INC) आणि राजदसोबत (RJD) सत्ता स्थापन केली. त्यामुळे बिहारमध्ये केवळ चोविस तासांत दुसरे सरकार स्थापन झाले, पण मुख्यमंत्री मात्र पुन्हा नितीश कुमारच राहिले.
आता याच पार्श्वभूमीवर बिहारच्या दोलायमान राजकारण आणि सत्तासंघर्षावर विख्यात निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी बिहारबाबत एक महत्वाचे भाकीत केले आहे.
बुधवारी बिहारमधील समस्तीपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी नितीश कुमार यांच्या रणनीतिवर टीका केली. ते म्हणाले, हा सर्व जनतेला मुर्ख बनविण्याचा प्रकार आहे.
तसेच हे महागठबंधन जर येणाऱ्या काळात दहा लाख नोकऱ्या देऊ शकले, तर मी आज पासून त्यांना समर्थन द्यायला तयार आहे. पण ते नोकऱ्या कुठुन देणार? जनतेने या युतीला समर्थन दिलेच नाही, असे प्रशांत किशोर म्हणाले.
नितीश कुमार खुर्चीला फेविकॉल लावून बसले आहेत. ते जनतेला दहा लाख नोकऱ्या देणार असतील, तर आम्ही सर्व टीका मागे घेऊन त्यांना समर्थन देऊ, असे किशोर यावेळी म्हणाले.
सध्याच्या परिस्थितीत जे लोक नोकरीवर आहेत, त्यांना सरकार पगार देऊ शकत नाही आहे. आणि तुम्ही म्हणत आहात की, ते दहा लाख नोकऱ्या देणार? अशा शब्दात त्यांनी नव्या नितीश कुमार सरकारचा समाचार घेतला.
नितीश कुमार यांना आता संधी मिळाली. येणाऱ्या निवडणुकांत सर्व काही 180 अंशात फिरेल, असे प्रशांत किशोर म्हणाले. मी ही भविष्यवाणी करत आहे, कारण यांच्या युतीला जनतेने मत दिले नाही.
महत्वाच्या बातम्या –
“…म्हणून नितीन गडकरींचं महत्व कमी करण्याचा भाजपचा प्रयत्न”
मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट; घेतला ‘हा’ निर्णय
देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय राजकारणात? भाजपने दिली मोठी जबाबदारी
काँग्रेसचे ‘हे’ बडे नेते एकनाथ शिंदे यांच्या भेटीला
“महिलेचे कपडे उत्तेजक असतील आणि लैगिक छळ झाला, तर…” – न्यायालय