तुकोबा आणि माऊलींच्या पालख्या सज्ज; ‘इतक्या’ वारकऱ्यांसह प्रस्थानास परवानगी

पुणे | पुण्यातून तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखींच्या प्रस्थानास परवानगी मिळाली आहे. जिल्हा प्रशासनाने 50 वारकऱ्यांसह पालखी प्रस्थानास परवागनी दिली आहे. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी ही माहिती दिली

तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा 12 जूनला आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान 13 जूनला होणार आहे.

कोरोनाचा संसर्ग लक्षात घेत प्रशासनाने पालखी प्रस्थानावर काही निर्बंध घातले आहेत. यानुसार संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला केवळ 50 लोकांच्या उपस्थितीस परवानगी देण्यात आली आहे.

देहू आणि आळंदी या तीर्थक्षेत्रांचा प्रतिबंधित क्षेत्रात समावेश नाही. या सोहळ्याला कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना बंधनकारक आहेत. उपस्थित सर्व वारकऱ्यांना मास्क स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण नियमांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-गुडन्यूज! भारतानं मान्यता दिलेल्या कोरोनाविरोधातील औषधाला मिळालं ‘हे’ मोठं यश

-‘या’ गोष्टीमुळे काँग्रेस नाराज; मुख्यमंत्र्यांशी स्वतंत्र चर्चा करणार

-कठोर नियम करा, पण महाराष्ट्रातील मंदिरं उघडा; ब्राह्मण महासंघाची मागणी

-लक्षणं न दिसणाऱ्या लोकांपासून वाढतोय कोरोनाचा धोका; असा करा स्वतःचा बचाव

-“चक्रीवादळग्रस्तांना काहीच मदत मिळाली नाही, अत्यंत वाईट अवस्थेत लोकांना ठेवलंय”