‘या’ आमदारानं उद्धव ठाकरेंना आधीच अलर्ट दिला होता!, आता तोही आमदार या फोटोत

मुंबई | शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नाराज होऊन सूरतला निघून गेल्यानंतर राज्यातील राजकारणात भूकंप झाला आहे. शिंदे यांच्यासोबत 40 आमदार असल्याची माहिती आहे. त्यामुळे शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर आहे. मात्र काही महिन्यांपूर्वी शिवसेनेच्या आमदारानं उद्धव ठाकरेंना अलर्ट दिला होता. ते आमदार प्रताप सरनाईक.

आमदार प्रताप सरनाईक यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपशी युती करण्याची विनंती केली होती.

सरनाईकांच्या या पत्रामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. मात्र त्यावेळी उद्धव ठाकरेंनी याकडे दुर्लक्ष केल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. कारण बंड केलेल्या एकनाथ शिंदेसोबत प्रताप सरनाईकही दिसले.

प्रताप सरनाईकांनी पत्रात काय म्हटलं होतं?  

सत्तेत एकत्र राहून काँग्रेस-राष्ट्रवादी आपलेच कार्यकर्ते फोडत असेल, आपला पक्ष कमकुवत करत असेल तर या स्थितीत पुन्हा एकदा आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेतेलेलं बरं, असं माझं वैयक्तिक मत आहे, असं त्यांनी पत्रात म्हटलं होतं.

निदान यामुळे प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या आपल्या सहकाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना होणारा नाहक त्रास तरी थांबेल अशी अनेक कार्यकर्त्यांची भावना आहे, असंही पुढे प्रताप सरनाईक म्हणाले होते.

पुढील वर्षी मुंबई, ठाणे व अन्य महापालिकांच्या निवडणुका आहेत. आतापर्यंत राज्यात आपली युती तुटली असली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तुटण्याआधी जुळवून घेतलेले बरे होईल, असंही त्यांनी म्हटलं होतं.

प्रताप सरनाईक यांनी उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या या पत्रामध्ये काही अत्यंत गंभीर असे मुद्दे मांडले होते. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमुळं शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असं भासवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं सरनाईक यांनी पत्रात म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

सर्वात मोठी बातमी! राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण 

उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का; ‘शिवसेने’वर एकनाथ शिंदेंचं वर्चस्व येणार? 

‘सामना’च्या अग्रलेखाची धार वाढली, पाहा नेमकं काय म्हटलंय… 

एकनाथ शिंदेंचा सर्वात मोठा दावा; शिवसेनेचं टेंशन आणखी वाढलं