मुंबई | महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये सध्या विविध मुद्द्यांवरून जोरदार वाद पेटला आहे. राज्य सरकारनं शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या एका प्रकल्पावरील दंड माफ केल्यानं हा वाद वाढला आहे.
काही दिवसांपूर्वी आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीनं कारवाई केली होती. त्यांच्या अनेक कार्यालयांवर छापेमारी झाल्यानं सरनाईक यांच्या अडचणीत वाढ झाली होती.
सरनाईक यांनी आपल्यावर सुडबद्धीन कारवाई केली जात असल्याचं बोललं होतं. त्यांनी याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपसोबत आघाडी करण्याचा विचार बोलून दाखवला होता.
छाब्बया विहंग गार्डनचा वाद आता राज्यात गाजत आहे. हा प्रकल्प प्रताप सरनाईक यांनी पुर्णत्वास नेला होता. पण तत्कालिन पालिका आयुक्तांनी अयोग्य कारभाराचा ठपका ठेवत या प्रकल्पासाठी सरनाईक यांना दंड ठोठावला होता.
राज्य सरकारनं मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत गार्डनवर लावण्यात आलेला दंड माफ करण्याचा निर्णय घेतल्यानं प्रताप सरनाईक पुन्हा चर्चेत आले आहेत.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आपल्यावर चुकीचे आरोप केले होते. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये फडणवीस यांच्याकडं नगरविकास खात होतं तेव्हा तर या प्रकल्पामध्ये काही चुकीचं आढळलं नाही, असं सरनाईक म्हणाले आहेत.
राज्य सरकारनं दंड माफ करून आम्हाला न्याय दिला आहे. या बांधकामात एक इंच देखील काम बेकायदेशीर आणि अनधिकृत नाही तसं आढळलं तर मी आमदारकीचा राजीनामा देईन, असं सरनाईक म्हणाले आहेत.
किरीट सोमय्या आणि भाजपवाल्यांनी अभ्यास करून बोलावे. किरीट सोमय्या यांना तर दंड किती होता हे देखील माहिती नाही, असा टोला सरनाईक यांनी लगावला आहे.
दरम्यान, आपल्या पक्षातील आमदाराच्या प्रकल्पाचा दंड माफ केल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका होताना दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या –
राजकीय भाष्य नडलं! ‘मुलगी झाली हो’ मालिकेतून अभिनेते किरण माने यांना बाहेरचा रस्ता
वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय
महिलांसाठी LIC ची जबरदस्त योजना; रोज 29 रूपये गुंतवा अन् मिळवा इतके लाख
5 वर्षांची चिमुकली रिपोर्टर पाहिलीत का?; पाहा हफिजाची रिपोर्टिंग
श्रेयवादाची लढाई सुरू! राज ठाकरेंचा ‘तो’ जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल