मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे मागील काही दिवसांपासून राजकारणाच्या चावडीच्या बैठकीत सापडले नाहीत. काही दिवसांपूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं होतं.
अशातच आज सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथे जिल्हा भाजपच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. त्यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे तोंडभरून कौतूक केलं आहे.
आयुष्यात काय करायचे, ते कसे करायचे, या प्रश्नांच्या उत्तरासाठी नारायण राणेंचा अभ्यास केला पाहिजे, असं दरेकर म्हणाले आहेत.
आपल्यावर आलेल्या सर्व संकटांवर मात करून पुढं जाण्याची उमेद देणारा राजकीय नेता म्हणजे नारायण राणे, असं म्हणत दरेकरांनी राणेंचं तोंडभरून कौतूक केलंय.
आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री एवढी पदं मिळवताना त्यांच्या आयुष्याच्या वाटेवर काटे आले, संकटे आली. पण ती दूर करीत नारायण राणे या पदांवर पोचल्याचं दरेकरांनी म्हटलं.
कोकणचा विकास होण्यासाठी अजून किमान 20 वर्षे नारायण राणे सक्रिय पाहिजेत. कारण, त्यांच्या उंचीएवढा कोकणात दुसरा नेता नाही, असं दरेकर यावेळी म्हणाले आहेत.
दरम्यान, नारायण राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रसाद लाड यांनी देखील संघर्ष, जिद्द आणि यश या तिघांचे उत्तम उदाहरण म्हणजे नारायण राणे, असं म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
राज्यातील शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर; ‘या’ तारखेपासून सुट्ट्या सुरू
अत्यंत धक्कादायक! सुंदर बायकोवर कोणाची नजर पडू नये म्हणून नवऱ्याने केलं भयानक कृत्य
“केंद्र सरकारला लाज वाटत असेल तर…”, संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
सोमय्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
मोठी बातमी! किरीट सोमय्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता