गणपतीच्या पाटाखाली भारताचे संविधान ठेवल्यामुळे ट्रोल झालेल्या तरडेंनी मागितली जाहीर माफी; म्हणाले…

पुणे | आज बाप्पाच्या आगमनाने सर्वत्र आनंदी आनंद आहे. कोरोना असल तरी लोकांमध्ये उत्साह आणि उर्जा पाहायला मिळत आहे. बाजारात कोरोनामुळे यावर्षी सजावटीचे सामान भेटलं नसल्याने सर्वांनी काहीना काहीना काही कल्पना करत घरातील गणपतीची सजावट केली आहे. मात्र अभिनेते आिणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी केलेल्या सजवटीमुळे ते मोठ्या प्रमाणात ट्रोल झाले परंतू त्यांनीही जाहीरपणे मोठ्या मनाने सर्वांची माफी मागितली आहे.

प्रवीण तरडेंनी पुस्तक गणपती कल्पना डोक्यात ठेवत आपल्या घरातील गणपतीची तशी सजावट केली होती. आपल्या सजावटीचा फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. परंतू झालं असं की फोटो सोशल मीडियावर काही क्षणातच हा फोटो मोठया प्रमाणात व्हायरल झाला आणि तरडेंवर टीका झाली. फोटोमध्ये दिसत होतं की त्यांनी साकारलेल्या पुस्तक गणपतीमध्ये त्यांनी बाप्पाची मुर्ती ही भारताच्या संविधानवर ठेवलेली. नेटकऱ्यांनी तरडेंवर खूप टीका झाली मात्र त्यानीही लगेच एक व्हिडीओ पोस्ट करत सर्वांची मनापासून माफी मागितली.

माझ्या घरी पुस्तक गणपती अशी संकल्पना होती. बुद्धीची देवता आणि बुद्धीचं सर्वात मोठं प्रतिक अशी माझी एक भावना होती. मी केलेली चूक अनेकांनी माझ्या लक्षात आणून दिली. आरपीआय, भीम आर्मी तसंच लातूर आणि पुण्यातील संघटनांनी मला याची जाणीव करुन दिली. मी सर्व दलित बांधवांची, ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यांची जाहीर माफी मागत असल्याचं तरडेंनी व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, मी खूप समाजिक भावना जपतो. याआधी कधीच चूक झालेली नाही आणि होणार नाही. जगभरातल्या दलित बांधवांची मी जाहीर माफी मागत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

सुशांतच्या संपत्तीचा वारस कोण? सुशांतच्या वडिलांचा मोठा निर्णय

शिवसेना 2014-19 दरम्यान भाजपसोबत असती तर…; फडणवीसांचा शिवसेनेवर निशाणा

राष्ट्रवादीवर पसरली शोककळा! ‘या’ दोन बड्या नेत्यांच एकाच दिवशी निधन

स्वतःची इमेज चमकविण्यासाठी युवा नेता स्वतः सीबीआयसमोर जाणार; भाजपचा आरोप

…म्हणून पुणे न्यायालयाने चंद्रकांत पाटलांविरूद्ध दिले चौकशीचे आदेश