महाराष्ट्र Top news नाशिक

“फडणवीसांच्या नेतृत्वात सरकार येणार, आम्ही महाराजांच्या गनिमी काव्यानं वागणार”

Uddhav thackeray And Devendra fadanvis

नाशिक | विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केलेल्या दाव्याने खळबळ माजली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार नक्की येणार, असा दावा प्रविण दरेकर यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले जनतेनं सरकारला आपलं मानलं आहे. पण सरकारनं जनतेला आपलं नाही. गेल्या दोन वर्षात राज्यात सरकार नावाची गोष्ट नाही, अशी टीका प्रविण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर केली आहे. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात आमचं सरकार येणारे. कधी येणार तेही आम्ही सांगणार. थोडं शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यानं वागणार, असा इशारा प्रविण दरेकर यांनी दिला आहे.

केंद्रीय नेतृत्व चंद्रकांत पाटलांवर नाराज असल्याची चर्चा आहे. यावरही प्रविण दरेकरांनी भाष्य केलं आहे. चंद्रकांत पाटलांवर केंद्रीय नेतृत्व नाराज नाही. ही चर्चा तुमच्याकडूनच ऐकतोय. कोणत्याची प्रकारे नाराजीची चर्चा नाही, असं प्रविण दरेकर म्हणालेत.

जितेंद्र आव्हाड हे वादग्रस्त वक्तव्य करुन वातावरण खराब करत आहेत. ते आता मंत्री आहेत. त्यांनी जबाबदारीनं वागावं, असा सल्लाही दरेकर यांनी आव्हाडांना दिलाय.

दरेकर यांनी मंत्री भुजबळांवरही गंभीर आरोप केलाय. भुजबळ विनोद बर्वेंना चांगली जबाबदार देणार म्हणाले होते. हीच जबाबदारी देणार होते का?, असा सवाल त्यांनी केलाय.

भुजबळ पालकमंत्री झाल्यावर शहरातील गुन्हेगारी वाढली आहे. या प्रकरणात मोक्का, फाशी अशी शिक्षा अपेक्षित आहे. आरोपी बाहेर आला तर कायद्यावर विश्वास राहणार नाही, असं प्रविण दरेकर म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘…तर ताबडतोब डॉक्टरांकडे जा’; कोरोनाच्या नव्या Omicron व्हेरिएंटची लक्षणं आली समोर 

संसदेत प्रश्न विचारा, आम्ही खुल्या चर्चेला तयार, पण…- नरेंद्र मोदी 

अमृता फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका, म्हणाल्या… 

“महाराष्ट्राची बदनामी याच पुत्र प्रेम, पब, पार्टी, पेग आणि पेंग्वीनमुळे झाली” 

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने महाराष्ट्राचं टेंशन वाढलं; राजेश टोपेंनी केंद्राकडे केली ‘ही’ मागणी