“ठाकरे सरकारनं केलेली शेतकरी कर्जमाफीची घोषणा खोटी”

मुंबई| सरकारची शेतकरी कर्जमाफीची आकडेवारी ही फसवी असल्याचं सांगत भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी सरकारवर हल्लाबोल केला. सरकारनं शेतकरी कर्जमाफीची केलेली घोषणा ही फसवी आहे.

सरकारनं जाहीर केलेल्या आकड्यांमधील अनेकांची संपूर्ण कर्जमाफी होणार नाही, असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. शेतकरी कर्जमाफीबद्दल आम्ही सरकारला विचारणा केली.  त्यानंतर सोमवारी सरकारकडून कर्जमाफीची पहिली यादी जाहीर करण्यात आली. ही आकडेवारी फसवी आहे.

राज्यातील शेतकऱ्यांमध्ये सरकारविषयी असंतोष आहे. ठाकरे सरकारकडून वचनपूर्वी झालेली नाही. आम्ही सरकारचा निषेध करतो. आम्ही दोन्ही सभागृहांमध्ये आक्रमकपणे आमची बाजू मांडण्याचा प्रयत्न करू, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

सोमवारपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी विरोधकांकडून निरनिराळ्या विषयांवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. पहिल्याच दिवशी भाजपनं सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचं पहायला मिळालं. महिला अत्याचार, शेतकरी कर्जमाफी यावरून त्यांनी सरकारवर टीका केल्याचंही पहायला मिळालं होतं.

महत्वाच्या बातम्या- 

-तावरे गुरु-शिष्याचा पराभव करत अजित पवारांनी माळेगावचा गड आणला खेचून

-सर्वांच लक्ष वेधून घेणारी ट्रम्प यांच्यासोबत असणारी ‘ती’ महिला नक्की आहे तरी कोण?

-अजित पवारांनी आपला ‘तो’ शब्द खरा करुन दाखवला!

-CAA वरुन राजधानी पेटली; पोलिसासह 5 जणांनी जीव गमावला

-संजय राऊतांचा फडणवीसांना खोचक सल्ला म्हणतात…