मुंबई | कोरोना काळात राज्यात मोठ्या प्रमाणात निर्बंध लागू असल्यानं आणि कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं राज्य सरकारच्या महसूलात कमालीची घट पहायला मिळाली होती. त्यानंतर आता सरकार महसूल वाढीसाठी विविध प्रयत्न करत आहे.
राज्यातील महसूल वाढीसाठी राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय थेट व्यसनाशी संबंधित असल्याची टीका राज्य सरकारवर होताना दिसत आहे.
राज्यातील सुपर मार्केटमध्ये आणि किराणा दुकानात आता वाईन विकायला परवानगी मिळणार आहे. राज्य सरकारनं महसूल वाढीसह द्राक्षं बागायतदारांना दिलासा देण्याचं उदिष्ट्य ठेवलं आहे.
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी वाईन विक्रीच्या परवानगीची घोषणा केली आहे. राज्य सरकारनं हा निर्णय घेताच सरकारवर जोरदार टीका व्हायला सुरूवात झाली आहे.
राज्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेेते प्रविण दरेकर यांनी सरकावर जोरदार टीका केली आहे. परिणामी राज्यात परत एकदा सरकार विरूद्ध भाजप असा सामना रंगला आहे.
राज्य सरकारच्या मंत्रीमंडळाचा निर्णय अत्यंत दुर्दैवी असून या सरकारला फक्त दारुड्यांची काळजी आहे, अशी खरमरीत टीका सरकावर दरेकर यांनी केली आहे.
उद्याची पिढी बरबाद होईल याची त्यांना पर्वा नाही. शेतकऱ्यांच्या भल्याच्या नावावर सुपर मार्केटमध्ये वाईन विकण्याचा व्यभिचार एका अर्थाने हे सरकार करत आहे, असंही दरेकर म्हणाले आहेत.
शुद्धीवर नसलेल्या सरकारचा हा एक भरकटलेला निर्णय घेतला आहे. राज्य सरकारनं अत्यंत चुकीचा निर्णय घेतला आहे, अशी टीका दरेकर यांनी केली आहे. परिणामी राज्यात या निर्णयानं मोठा वाद उभा राहिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मद्यप्रेमींसाठी गुडन्यूज! आता किराणा दुकांनामध्ये वाईन मिळणार
आता कोरोना लस मेडिकल स्टोअरमध्ये मिळणार, ‘या’ दोन लसींना DCGI ची परवानगी
टीम इंडियात दोन खतरनाक ऑलराउंडर्सची एन्ट्री; क्षणात मॅच पलटवण्याची क्षमता
मालेगावात काँग्रेस ऑलआऊट! महापौरांसह तब्बल 27 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
“…तर भाजप राष्ट्रपती कोविंद यांचा राजीनामा घेणार का?”