“शिवसेनेच्या कामगिरीसाठी त्यांना शुभेच्छा, आम्हाला दु:ख वाटण्याचं कारण नाही”

मुंबई | दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी फेब्रुवारी महिन्यात मुंबईतील मरीन ड्राईव्ह लगतच्या एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं होतं.

डेलकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर 30 ऑक्टोबर रोजी मतदान पार पडलं तर काल मतमोजणीही झाली. या निवडणुकीत सेनेच्या कलाबेन डेलकर यांनी भाजपच्या महेश गावीत यांचा 51 हजार मतांनी पराभव केला.

महाराष्ट्राबाहेर शिवसेनेचा पहिला खासदार विजयी झाल्याने साहजिक या विजयाची देशभर चर्चा आहे. अनेक राजकीय पक्षाचे नेते शिवसेनेला शुभेच्छा देतायत.

महाराष्ट्रातील विरोधी पक्ष भाजपनेही शिवसेनेला सीमोल्लंघनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रवीण दरेकर यांनी शुभेच्छा देताना मात्र जोरदार फटकेबाजी केली.

महाराष्ट्राबाहेर शिवसेनेचा पहिला खासदार निवडून आलाय. आम्हाला आनंद आहे, दु:ख असण्याचं काहीच कारण नाही, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले. शुभेच्छा देताना दरेकरांनी शिवसेनेला चिमटेही काढले आहेत.

शिवसेनेच्या कामगिरीसाठी आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. आम्हाला दु:ख वाटण्याचं कारण नाही, आम्हाला आनंदच आहे, असं दरेकर म्हणालेत.

महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना शिवसेनेने मराठी अस्मिता, हिंदुत्व हे सगळं गुंडाळून ठेवलं, अशी टीका त्यांनी केलीये.

ज्यांनी आयुष्यभर हिंदुत्वाला विरोध केला, मराठी अस्मितेला विरोध केला, स्वाभिमानाला विरोध केला त्यांच्याशीच सेनेने हातमिळवणी केली. दादरा नगर हवेलीची जागा जिंकल्याने सेना जर राष्ट्रीय राजकारणात जाणार असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा, असं दरेकर म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्रासह देशभरातील 13 राज्यात विधानसभेच्या 29 जागांसाठी पोटनिवडणूक पार पडल्या. त्यासाठी 30 नोव्हेंबरला मतदान तर 2 ऑक्टोबर रोजी मतमोजणी करण्यात आली.

या निवडणुकीत भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने एकूण 15 जागांवर विजय मिळवला. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने सर्व जागांवर विजय मिळवलाय.

महत्त्वाच्या बातम्या-

“नवाब मलिक आणि त्यांनी आरोप केलेल्यांची नार्को टेस्ट करा” 

पराभवानंतर सुभाष साबने यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले… 

“मी लस घेतली नाही आणि घेणारही नाही, कोरोनावर एकच उपाय…” 

“अशोक चव्हाण यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी प्रयत्न करणार”

“जावयामुळे येडा झालेला जगातला पहिला सासरा, वर्गणी काढून वेड्याच्या…”