प्रवीण दरेकरांचा करिश्मा, ‘ही’ निवडणूक एकहाती जिंकली!

मुंबई | राज्यात सध्या जिल्हा बँकांच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर मुंबई जिल्हा बँकेच्या चार जागांसाठी आज मतदान पार पडले.

मुंबई जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालं आहे. भाजपचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या सहकार पॅनेलचा दणदणीत विजय झाला आहे.

मुंबई जिल्हा बँकेवर प्रवीण दरेकरांनी एकहाती सत्ता स्थापन करत आपलं वर्चस्व कायम केलं आहे. प्रवीण दरेकरांचं पॅनेल सर्व जागांवर विजय मिळवण्यात यशस्वी झालं आहे.

मुंबई जिल्हा बँकेच्या एकुण 21 जागा आहेत. 21 पैकी 17 जागांवर बिनविरोध निवड करण्यात आली. उर्वरीत चार जागांसाठी आठ उमेदवार मैदानात होते.

या चारही जागांवर प्रवीण दरेकरांच्या सहकार पॅनेलचे उमेदवार चांगल्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. या विजयामुळे दरेकरांचं सहकार पॅनेलवरचं वर्चस्व मात्र कायम राहिलं आहे.

मुंबई जिल्हा बँकेत आपली एकहाती सत्ता स्थापन केल्यानंतर प्रवीण दरेकरांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. मुंबईतील सहकार चळवळीच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास दाखवल्याचं प्रवीण दरेकर म्हटले.

अनेकांनी मुबई जिल्हा बँकेच्या कारभाराबाबत टीकाटीप्पणी केली होती. मात्र, मुंबई जिल्हा बँकेच्या मतदारांनी आमच्या कारभारावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलं आहे, असं वक्तव्य प्रवीण दरेकरांनी निवडणूक जिंकल्यावर केलं आहे.

प्रवीण दरेकरांच्या सहकार पॅनेलचा मुंबई जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एकहाती विजय झाल्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

मुंबई जिल्हा बँकेच्या 21 पैकी 21 जागा जिंकत जिल्हा बँकेवर आपलंच वर्चस्व असल्याचं प्रवीण दरेकर यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“…तर भारताचा पाकिस्तान करायला वेळ लावणार नाही”

ओमिक्रॉनचं नवं लक्षण आलं समोर, अजिबात अंगावर काढू नका!

कोरोनाबाधित असूनही सुप्रिया सुळेंनी घेतली निलेश लंकेंची भेट?; भाजपकडून टीकेची झोड

आर्यन खान प्रकरणातील कॉर्डेलिया क्रुझवर अडकले 2000 प्रवासी; ‘हे’ धक्कादायक कारण आलं समोर

“सिंधुदुर्गात रंगतदार काहीच नसतं, जे घडतं ते रक्तरंजित असतं”