सुशांतच्या आत्महत्येनंतर प्रवीण तरडेंची फेसबुक पोस्ट होतेय व्हायरल

मुंबई |  अतिशय हुशार सुस्वभावी आणि हसतमुख अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येने मनोरंजन विश्वाला हादरवून सोडले आहेत. यशाच्या शिखरावर असताना त्याने आयुष्य का संपवले? याची चर्चा सध्या सुरू आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर अनेकांनी त्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे. मराठी अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी सुशांतला फेसबुक पोस्टद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे.

सुशांत गेल्याचं दु:ख मोठं आहे. आत्महत्येपासून सुटकेसाठी तु ‘छिछोरे’ दिलास मग आज तूच असा का गेलास…. I HATE YOU SUSHANT, अशी भावनाविवश फेसबुक पोस्ट तरडे यांनी केली आहे.

अपयश आल्यास आत्महत्या हा पर्याय नाही असा संदेश देणारा ‘छिछोरे’ हा सुशांतचा आलीकडच्या काळातला सर्वाधिक चर्चेतला चित्रपट होता. क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीच्या क्रिकेट कारकीर्दीवर बेतलेल्या सिनेमातून लोकप्रिय झालेल्या सुशांतने इतकं टोकाचं पाऊलं का उचललं असावं? याचा अद्याप उलगडा झालेला नाहीये.

सुशांतच्या जाण्याने कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे तसंच बॉलिवूडवर देखील मोठी शोककळा पसरलीच आहे. अनेक दिग्गज अभिनेत्यांनी सुशांतच्या अभिनयाचं कौतुक करत त्याला श्रद्धांजली अर्पित केली आहे. तसंच सुशांतबरोबरच्या त्यांच्या आठवणी जाग्या केल्या आहेत.

 

 

 

महत्वाच्या बातम्या-

-सुशांतच्या कुटुंबावर पुन्हा दुखा:चा डोंगर, परिवारातील ‘या’ व्यक्तीने घेतला अखेरचा श्वास

-महाविकास आघाडीत कुरबूर, शिवसेनेचे सामनातून काँग्रेसला चिमटे

-“शरद पवारांचं आमंत्रण म्हणजे लबाडाघरचं जेवण, जेवल्याशिवाय काही खरं नाही”

-बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवर शक्ती कपूर यांचं रोखठोक वक्तव्य

-मुंबईत आढळली कोरोनाची नवी लक्षणं; ‘ही’ लक्षणं दिसली तर लगेच डॉक्टरांकडे जा!