महाराष्ट्र मुंबई

‘तुझ्या गव्हाच्या कापणीला मी स्वत: ईळा घेऊन येणार’; प्रवीण तरडेंनी ‘त्या’ शेतकऱ्याला दिला शब्द

मुंबई | ‘देऊळबंद’ आणि ‘मुळशी पॅटर्न’नंतर प्रवीण तरडेंचं लेखन- दिग्दर्शन असलेला ऐतिहासिक सिनेमा ‘सरसेनापती हंबीरराव’ याची घोषणा काही महिन्यांपूर्वी झाली आहे. याच चित्रपटाचं नाव एका शेतकऱ्याने ‘ग्रास आर्ट’च्या स्वरुपात तयार केलंय.

प्रवीण तरडेंनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर त्या शेतकऱ्याच्या व्हिडीओ पोस्ट केलाय. अभयसिंह अडसूळ या शेतकरी मित्राच्या संकल्पनेतून कुंडलिक राक्षे या शेतकऱ्याने गव्हाची अशी शेती केली. याला बहुदा ग्रास आर्ट म्हणतात, असं तरडेंनी सांगितलं आहे.

कुंडलिक मी तुला ओळखत नाही पण माझा शब्द आहे तुला, तुझ्या या गव्हाच्या कापणीला मी स्वत: ईळा घेऊन येणार, असा शब्द प्रवीण तरडेंनी या शेतकऱ्याला दिला आहे.

दरम्यान, हंबीरराव मोहिते हे छ. शिवाजी महाराज आणि छ. संभाजी महाराज यांचे सेनापती होते. त्यांनी आपल्या चाणाक्ष बुद्धीमत्तेच्या जोरावर स्वराज्याला श्रीमंती मिळवून देण्यास मदत केली. त्यांच्याच नजरेतून मराठा साम्राज्य या चित्रपटात दिसणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-कोरोना हे तिसरं महायुद्ध, चीनी वस्तूंवर बहिष्कार घालून धडा शिकवला पाहिजे- रामदास आठवले

-झेपत नाहीये हे कबूल करण्याचा प्रमाणिकपणा नाही; भाजपचा जयंत पाटलांना टोला

-रामजन्मभूमीचं सपाटीकरण करत असताना सापडल्या प्राचीन मूर्ती-शिवलिंग; वाचा संपूर्ण प्रकार

-महिला पोलिसानं केलेलं ‘हे’ कौतुकास्पद काम पाहून तुम्हीही त्यांना सलाम ठोकाल!

-उद्धव ठाकरेंचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना दणका, उचललं ‘हे’ पाऊल