पुणे | गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री केतकी चितळेचं प्रकरण चर्चेचा विषय आहे. केतकीनं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा यांच्या वादग्रस्त कविता पोस्ट केली होती.
शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळेविरोधात पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. सध्या केतकी चितळे न्यायालयीन कोठडीत आहे.
केतकीच्या या प्रकरणाविषयी प्रसिद्ध दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी भाष्य केलं आहे. केतकी प्रकरणाबद्दल मला खरच काही माहिती नाही. हे प्रकरण झालं तेव्हा मी माझ्या चित्रपटांच्या कामात आणि प्रमोशनमध्ये होतो.
चित्रपट सृष्टीत काम करणाऱ्या कोणत्याच कलाकाराने राजकीय भूमिका घेऊन नयेत या मताचा मी आहे, असं प्रविण तरडे यांनी म्हटलं.
प्रवीण तरडे तुम्हाला आयुष्यात कधी कुठल्या राजकीय व्यासपीठावर दिसणार नाही. ज्या दिवशी ते करेल तेव्हा त्याच दिवशी हे क्षेत्र बंद करेल, असंही प्रविण तरडे यांनी म्हटलं आहे.
दोन्ही क्षेत्राचा वापर एकमेकांसाठी नाही करायचा. एक कुठलं तरी पूर्ण वेळ असावं. कलाकार, नट हा समाजाचं देणं फेडण्यासाठी जन्माला आला आहे.
कलाकारांनी सोशल मीडियावर व्यक्त होताना काळजी घ्यावी, असंही तरडे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या –
कोरोना काळात अनाथ झालेल्या मुलांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा!
“देवेंद्र फडणवीस गैरसमज झाले असतील तर…”
मोठी बातमी | अखेर UPSC 2021 चा निकाल जाहीर
Gold Rate | सोनं-चांदीच्या दरात इतक्या रुपयांनी वाढ, वाचा ताजे दर