‘या’ 12 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान खात्याचा अंदाज

मुंबई | राज्यात सध्या मान्सूनपुर्व पावसाचं हवामान तयार होत आहे. तर काही भागात पाऊस देखील पडायला सुरूवात झाली आहे. अशातच आता हवामान विभागानं बारा जिल्ह्यांना इशारा दिला आहे.

मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रीत पुणे, सातारा, सांगली भागात पावसाच्या मध्यम स्वरूपाच्या सरी पाहायला मिळाल्या होत्या. अगोदरच हवामान विभागानं मान्सूनपुर्व पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

सध्या आग्नेय बंगालचा उपसागर आणि लगतच्या दक्षिण अंदमान समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय. त्यामुळे आता भारतीय किनारपट्टी भागात मोठा धोका निर्माण झाला आहे.

या चक्रीवादळामुळे आता महाराष्ट्रातील तापमान कमी झाल्याचं पहायला मिळतंय. कोकण तसेच घाट परिसर आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पावसासाठी पोषक हवामान तयार झालंय.

पुणे, मुंबई, पालघर, ठाणे, नाशिक, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या 12 जिल्ह्यात आता पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

या 12 जिल्ह्यात सकाळपासूनच आज ढगाळ वातावरण होतं. त्यामुळे नागरिकांना उन्हापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मंगळवार आणि बुधवारी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरमध्ये चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाल्याने आता मच्छिमारांना आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

 संभाजीराजेंसाठी शिवसेना मोठी खेळी करण्याची शक्यता!

ज्ञानवापी मशिद प्रकरणावर कंगणा राणावतचं मोठं वक्तव्य, म्हणाली…

मोठी बातमी! नवज्योतसिंग सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका 

“मुस्लिमांनी आयुष्यभर काँग्रेसला मतदान करून आपली जिंदगी झंड बनवली”