संतापजनक! गर्भवती वनरक्षक महिलेला माजी सरपंचाकडून मारहाण, पाहा व्हिडीओ

सातारा | साताऱ्यात एक संतापजनक प्रकार घडला आहे. येथील पळसवडे गावच्या माजी सरपंचाने वनरक्षक महिला कर्मचाऱ्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे‌.

वनविभागाच्या महिला कर्मचारी या तीन महिन्यांच्या गर्भवती असून त्यांना अमानुष पद्धतीने मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

या घडलेल्या प्रकाराची तक्रार सातारा पोलीस ठाण्यात करण्यात आल्याची माहिती स्वतः या कर्मचाऱ्याने दिली आहे. पळसवडे गावचे माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी महिला वनरक्षक सिंधू सानप आणि सूर्याजी ठोंबरे यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

मला न विचारता वन मजूर दुसरीकडे का नेलं या कारणाने चिडून जाऊन वन समितीचे अध्यक्ष आणि पळसवडे गावचे माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी ही मारहाण केली आहे. मारहाण करणाऱ्या सरपंचाविरोधात सातारा तालुका पोलिसांत ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी रामचंद्र जानकर आणि त्यांची पत्नी प्रतिभा जानकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून संपूर्ण जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे.

सानप यांचे पती सूर्याजी ठोंबरे हे देखील वनरक्षक आहेत. त्यांनी सांगितलं की, सानप यांना धमक्या मिळाल्यामुळं मला आमच्या वरिष्ठांनी त्यांच्यासोबत जाण्यास सांगितलं.

आम्ही गस्तीवर असताना मला प्रतिभा जानकर यांनी मला चप्पलनं मारहाण केली. यावेळी सानप मला सोडवण्यासाठी मध्यस्ती करत असताना जानकर पती पत्नींनी मला सोडून सानप यांना मारहाण केली असं ठोंबरे यांनी सांगितलं आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या- 

“देवेंद्र फडणवीस यांची अवस्था कुणी खुर्ची देता का खुर्ची अशी” 

‘…तर कामावरून काढून टाकलं जाईल’; सरकारचे कर्मचाऱ्यांना कडक निर्देश 

यशोमती ठाकूर यांनी केलेल्या टीकेला बच्चू कडूंचं प्रत्युत्तर, म्हणाले ‘भूत लागल्या प्रमाणे…’ 

राज्यातील ‘या’ भागात अवकाळी पावसाची शक्यता; वाचा हवामान खात्याचा अंदाज 

आठवड्यापासून बेपत्ता डूग्गू कसा सापडला?, वाचा काय घडलं?