जगभरात NeoCoV व्हायरसची दहशत; तज्ज्ञांनी दिली अत्यंत धक्कादायक माहिती

नवी दिल्ली | कोरोना महामारीमुळं गेल्या दीड वर्षात जगानं अनेक समस्यांचा सामना केला आहे. कोरोना आटोक्यात आला असं वाटत असताना दोन महिन्यापासून अचानकपणे कोरोना रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ झाली आहे.

कोरोना रूग्णसंख्येत जानेवारीच्या सुरूवातीला प्रचंड मोठी वाढ नोंदवली गेली. परिणामी पुन्हा एकदा आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढतो की काय अशी परिस्थिती तयार झाली होती.

कोरोना काळात फक्त पुस्ताकामध्ये वाचलेले अल्फा, डेल्टा या शब्दांसह ओमिक्राॅन असे शब्द ऐकायला मिळाले. ओमिक्राॅनच्या प्रादुर्भावामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे.

अशात आता ओमिक्राॅनचा प्रादुर्भाव कमी होत नाही तोच निओकोव्ह या प्रकारचा एक कोरोना व्हेरियंट सर्वांना चिंतेत टाकत आहे. गत काही दिवसांमध्ये या शब्दाला प्रचंड मोठ्या प्रमाणात सर्च करण्यात आलं आहे.

निओकोव्ह या शब्दाला भारतात 28 जानेवारीच्या आगोदर 5 लाख वेळा सर्च करण्यात आलं आहे. सध्या गुगलवर सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या गोष्टींमध्ये याचा समावेश आहे. सुमारे 35 टक्के लोक MERS-CoV संक्रमणाखाली आले आहेत. NeoCoV या विशेष कोरोना व्हायरसचा संभाव्य व्हेरिएंट आहे.

अभ्यासकांच्या मते निओकोव्ह हा काही कोरोनाचा प्रकार नाही. परिणामी चिंता करण्याचं काहीच कारण नाही. निओकोव्ह हा मर्सकोव्हचा एक प्रकार आहे. जो बॅटमध्ये शोधला जातो.

निओकोव्ह हा कोरोनाचा नवा व्हेरियंट आहे, अशी चर्चा होत आहे. अशात संशोधकांच्या दाव्यानं दिलासा मिळाला आहे पण चिंता तरीही कायम राहणार आहे.

निओकोव्हा हा नवा कोरोना व्हेरियंट नाही तर त्यावरील एका पीयर रिव्ह्यू स्टडीचा एक भाग आहे. चिनी शास्त्रज्ञांच्या एका गटानं ज्या गटात वुहानमधील अभ्यासकांचा समावेश आहे, त्यांनी हा अहवाल जारी केला आहे.

दरम्यान, सध्यातरी निओकोव्हामध्ये कसल्याही प्रकारची कोरोना व्हायरसची लक्षणं दिसत नाहीत. परिणामी भीती बाळगण्याचं काहीच कारण नाही, असंही संशोधकांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 ओमिक्रॉनमधून नीट झाल्यानंतर दिसतात ‘ही’ लक्षणं, अजिबात दुर्लक्ष करू नका

Budget 2022: बजेट म्हणजे नक्की काय असतं? तुम्हाला काय फायदा होतो? वाचा सविस्तर

“लीडर होण्यासाठी कर्णधार असणं गरजेचं नाही”, अखेर किंग कोहलीने सोडलं मौन

“शिवसेनेशी आमची युती होण्याचा प्रश्नच नाही, सोनिया गांधी यांना… “

 ऑनलाईन-ऑफलाईनचा गोंधळ वाढला, विद्यार्थ्यांनी केला शिक्षणमंत्र्यांच्या घरासमोर राडा