CAA कायद्यामुळे महात्मा गांधीजींचं स्वप्न पूर्ण झालं- राष्ट्रपती

नवी दिल्ली | आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय  अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात CAA कायद्यामुळे महात्मा गांधीजींचं स्वप्न पूर्ण झालंय, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे.

फाळणीनंतर पाकिस्तानातील हिंदू आणि शिख यांना तेथे राहण्याची इच्छा नसल्यास ते भारतात येऊ शकतात, असं महात्मा गांधी म्हणाले होते. याचीच आठवण राष्ट्रपतींनी करून देत आज नागरिकत्व सुधारणा कायदा आणून सरकारने महात्मा गांधींजींचं स्वप्न पूर्ण केलंय, असं ते म्हणाले.

लोकसभा आणि राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांनी CAA कायदा मंजूर करून गांधींचींचं स्वप्न पूर्ण करण्यास मदत केली, असं कोविंद म्हणाले. आपल्या राष्ट्राची निर्मिती करणाऱ्यांच्या इच्छेचा सन्मान करणं आपलं दायित्व आहे, असंही प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं.

पाकिस्तानमधील अल्पसंख्यांवरील अत्याचाराचा मी निषेध करतो. जागतिक समुदायाने याकडे दुर्लक्ष न करता त्वरीत पावले उचलावीत अशी मी विनंती करतो, असंही राष्ट्रपती म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-आज असा नटलाय… लग्नात पण एवढा नटला नसशील; दादांच्या तुफान फटकेबाजीने उडाले हास्याचे कारंजे

-जालन्यात टोळक्याची प्रेमी युगुलाला मारहाण; पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय तरी काय??

-आम्हाला देशभक्ती पाहिजे… दारूभक्ती नको- डॉ. अभय बंग

-कोणाच्या अन्नात विष कालवणे हे आमचे संस्कार नाहीत- येवले चहा

-पंतप्रधान मोदी भगवान राम तर अमित शहा हनुमान; भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य