पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपतीपदाची ऑफर दिली होती?; शरद पवारांचा गौप्यस्फोट

मुंबई |  राज्यात कुणाचं सरकार येणार यावरुन गोंधळ सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. यावेळी मोदींनी पवारांना राष्ट्रपतीपदाची ऑफर दिली होती अशा चर्चा रंगत होत्या. यावर शरद पवारांनी खुलासा केला आहे.

पंतप्रधान मोदींनी मला राष्ट्रपतीपदाची ऑफर दिली नव्हती, असं म्हणत त्यांनी या अफवांचं खंडन केलं आहे. शरद पवार ‘एबीपी माझा’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

मोदींसोबत दिल्लीत झालेल्या भेटीत काय झालं ते पवारांनी सांगितलं आहे. शेतीची चर्चा झाल्यानंतर मी उठायला निघालो तेव्हा मोदींनी मला थांबवून म्हटलं, आपण एकत्र येऊन काम केलं तर मला आनंद होईल.., असा खुलासा शरद पवारांनी केला आहे.

राष्ट्रीय पातळीवर सहकार्य करण्यास तयार आहे. मात्र, राज्यात एकत्र येणं शक्य नाही.  या मार्गावरून जाणं मला जमणार नाही, असं उत्तर पवारांनी पंतप्रधान मोदींना यावर दिलं होतं.

महत्ताच्या बातम्या-