Top news देश

पंतप्रधानांनी कोरोना लढ्यात योग्य वेळी योग्य पावलं उचलली; राष्ट्रपतींकडून मोदींची तारीफ

नवी दिल्ली |  कोरोना विषाणूचा धोका ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यापद्धतीने तत्परतेने पावलं टाकली आणि प्रभावी निर्णय घेतले ते वाखण्याजोगे आहेत, अशा शब्दात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं. आपण या वैश्विक महामारीला ज्या रितीने तोंड देतोय ते इतर राष्ट्रांसाठी निश्चितच प्रेरणा आहे, असंही राष्ट्रपती यावेशी म्हणाले.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ‘अमर उजाला’शी कोरोनाच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर संवाद साधला. यावेळी त्यांनी इथून पाठीमागचे साथीचे रोग आणि आताचा कोरोना यावर वितृत्व भाष्य केलं. तसंच कोरोना गेल्यानंरच्या जगात फार मोठा बदल झालेला असेल, असंही ते यावेळी म्हणाले. भारताची वाढती लोकसंख्या ही आपल्यासाठी चिंतेचा विषय आहे. त्यासाठी येत्या काळात सरकारकडून आणखी प्रयत्न आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं.

कोरोना महामारीनंतर आपला देशा अगोदरपेक्षा अधिक स्वावलंबी बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसंच बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिल्याप्रमाणे आपला देश खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम होईल, असंही ते म्हणाले.

सर्व प्राणीमात्र आणि वनस्पती एकमेकांवर अवलंबून असतात. परंतू मनुष्याने वनस्पती आणि जीवजंतूंच्या अनेक प्रजाती पूर्णपणे नष्ट केल्या आहेत. मानवजातीच्या अभूतपूर्व वाढीमुळे त्यांना इतर सर्व प्रजातींना नैसर्गिक स्रोत मिळत नाहीत. त्यामुळे येत्या काळात आपणाला याकडे देखील लक्ष देणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

महत्वाच्या बातम्या-

-…म्हणून फक्त परप्रांतीयांनाच मुंबई आणि पुण्यातून जाता येणार

-योग्य वेळी राज्यातील जनता मला पुन्हा सत्तेत आणेलच; देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

-“त्या फॉर्ममुळे गावात भांडणे सुरु झाली आहेत, सरकारने एकदाच काय ते धोरण निश्चित करावं”

-आम्ही स्वबळावर लढलो असतो तरी आम्ही 144 चा आकडा गाठला असता- देवेंद्र फडणवीस

-कोरोनाने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडले; 24 तासात वाढले ‘एवढे’ रुग्ण