इम्रान खान यांचा मदतीसाठी ट्रम्प यांना फोन; ते म्हणाले…तुमचं तुम्ही बघा!

न्यूयॉर्क : काश्मीर प्रश्नावर संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीची बैठक पार पडली. बंद दाराआड झालेल्या या बैठकीत चीनने पाकिस्तानची बाजू घेतली. तर रशियाने द्वीपक्षीय चर्चेचं समर्थन केलं. भारताने जम्मू काश्मीरबाबत घेतलेल्या निर्णयाने सद्यपरिस्थिती बदलली आहे, ज्यामुळे काश्मीरमध्ये नाजूक परिस्थिती असून यूएनएससी सदस्य मानवाधिकारांबाबत चिंतेत आहेत, असं चीनच्या प्रतिनिधीने बैठकीनंतर सांगितलं.

एकीकडे भारताने या बैठकीला फारसं गांभीर्याने घेतलं नाही, तर पाकिस्तानला मोठी अपेक्षा होती. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मदत मागण्यासाठी थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन केल्याचं समोर आलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी हा मुद्दा तुम्हीच चर्चा करुन सोडवा, असा सल्ला दिला. यूएनएससीच्या बैठकीत भारताविरोधात आवाज उठवण्याचा पाकिस्तान आणि चीनचा प्रयत्न अयशस्वी ठरला.

एएफपीच्या वृत्तानुसार, काश्मीर प्रश्नी भारत आणि पाकिस्तानने चर्चा करुन मार्ग काढावा, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी इम्रान खान यांना सांगितल्याचं व्हाईट हाऊसने सांगितलंय.

इम्रान खान यांनी काश्मीर प्रश्नी सद्यस्थितीची माहिती डोनाल्ड ट्रम्प यांना दिल्याचं पाकिस्तानकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. यूएनएससीमध्ये पाकिस्तानला अपेक्षित होतं तसं काहीही झालं नाही. कारण, अत्यंत अनौपचारिक पद्धतीने बैठक झाली, ज्यात चीन आणि पाकिस्तानची मागणी अमान्य झाली. 

महत्वाच्या बातम्या-

-“महापूर तीन जिल्ह्यातील प्रश्न आहे, त्यासाठी निवडणुका पुढे झकलण्याची गरज नाही”

-“नारायण राणेंनी शिवसेना सोडून चूक केली”

-…आता खासदार झालो तेही माझ्या मर्जीने नाही- नारायण राणे

-मोदी सरकारच्या ‘त्या’ निर्णयावर शिवसेना समाधानी!

-रवी शास्त्रींची पुन्हा एकदा भारताच्या प्रशिक्षकपदी निवड!