मुंबई | अभिनेते किरण माने हे नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असलेले पहायला मिळतात. ते नेहमीच बेधडकपणे आपलं मत मांडत असतात. अशातच ते त्यांच्या एका वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’या मालिकेत किरण माने भूमिका साकारत आहे. मात्र आता त्यांना या मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. किरण माने घेत असलेल्या राजकीय भूमिकांमुळे त्यांना मालिकेतून बाहेर काढण्यात आलं आहे.
अभिनेते किरण माने यांच्यावरुन सध्या राजकीय वातावरण चांगलंच पेटलं आहे. अशातच आता याप्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अभिनेता किरणं माने यांना मालिकेतून काढून टाकलं आहे. त्यांच्यावर आरोप आहे की एका राजकीय पक्षाच्या विरोधात ते लिखाण करत होते त्यामुळे त्यांना मालिकेतून काढल आहे, असं मलिकांनी म्हटलं.
मराठी इंडस्ट्रीत दबाव तंत्र सुरु आहे, हे योग्य नाही. स्टार प्रवाह या चॅनल ने पुन्हा विचारकरून कोणाच्या दबावा खाली दडपण आणून हे होत असेल तर योग्य नाही, असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
सत्ताधाऱ्यांना जाब विचारणं हे सजग नागरिकाचं कर्तव्य आहे तसंच एखाद्या नेत्याबद्दल पोस्ट केली म्हणजे त्या पक्षाचा झाले असं होत नाही, अशी प्रतिक्रिया किरण माने यांनी दिली होती.
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या लोकप्रिय मालिकेतून अभिनेते किरण माने यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता मालिकेतून त्यांना काढण्यात आलं आहे.
अशातच आता किरण माने यांनी मालिकेतून बाहेर काढण्याविषयी प्रतिक्रिया दिली आहे. राजकारणावर बोलू नका, लिहू नका असं म्हणणं अयोग्य आहे. याप्रकरणी कुणी पाठीशी उभं नाही राहिलं तरी मी एकटा लढेन, असंही किरण माने यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
महत्त्वाची बातमी! कोरोनामुळे बंद असलेल्या ‘या’ गाड्या पुन्हा रेल्वे ट्रॅकवर धावणार
‘नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही’; भाजपचा हल्लाबोल
“कंगना रणौतच्या गालापेक्षा जास्त सुंदर रस्ते बनवणार”
राजकारण तापलं: ऐन निवडणुकीच्या तोंडावर काॅंग्रेस उमेदवाराचे ‘ते’ फोटो व्हायरल
Petrol-Diesel Price: पेट्रोल- डिझेलचे नवे दर जाहीर, वाचा आजचे ताजे दर