Top news मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

धर्म परिवर्तनासाठी माझ्यावर दबाव टाकला; ‘या’ प्रसिद्ध सेलेब्रिटीच्या पत्नीचे धक्कादायक आरोप!

मुंबई | चित्रपट सृष्टीसाठी 2020 हे वर्ष अतिशय धाकाक्दायक ठरलं आहे. या वर्षात अनेक दिग्गज कलाकारांनी जगाचा निरोप घेतला आहे. सुप्रसिद्ध गायक वाजिद खान याने देखील 1 जून 2020 रोजी या जगाचा निरोप घेतला आहे.

वाजिद खान यांच्या निध.नामुळे संपूर्ण चित्रपट सृष्टी दुःखात बुडाली होती.  चाहत्यांची लाडकी साजिद- वाजिदची जोडी कायमची तुटली होती. अशातच आता वाजिद खानच्या कुटुंबात वाद चालू असल्याचं समोर आलं आहे. वाजिद खानची पत्नी कमलारुख खान हिने आपल्या सासऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

कमलारुख खान आणि वाजिद खान या दोघांनी आंतरजातीय विवाह केला होता. कमलारुख वेगळ्या धर्माची असल्यानं वाजिदच्या मु.त्युनंतर आता त्याचे कुटुंब तिच्यावर धर्मपरिवर्तन करण्यासाठी दबाव आणत असल्याचा आरोप तिने केला आहे.

कमलारुख खानने इन्स्टाग्रामवर नुकतीच याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने खान कुटुंबियांवर गंभीर आरोप केले आहेत. यासंबंधित तिने इन्स्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे.

तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, मी पारसी होते आणि वाजिद मुस्लीम. आम्ही दोघांनी स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत विवाह केला होता. मात्र, इंटरकास्ट मॅरेज केल्यानंतर एका मुलीला कोणत्या त्रासला सामोरं जावं लागतं याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे.

मी पारसी धर्माची असल्यानं माझ्यासोबत खान कुटुंबात भेदभाव केला जातो. तसेच नेहमी माझ्यावर बंधने लादण्यात आली. हे अतिशय लज्जास्पद असून सर्वांचे डोळे उघडवणारे आहे, असा आरोप कमलारुख हिने केला आहे. कमलारुखने केलेल्या आरोपांवर वाजिद खानच्या कुटुंबाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.

दरम्यान,  वाजिद खान हे अनेक दिवसांपासून गंभीर आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर उपचार देखील चालू होते. मात्र, त्यांचा आजार अचानक बळावल्यानं त्यांना मे 2020 मध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

रुग्णालयातील डॉक्टर वाजिद खान यांना वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न करत होते. मात्र, 1 जून 2020 रोजी वाजिद खान यांची मृ.त्यूशी झुंज थांबली आणि त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

महत्त्वाच्या बातम्या-

‘कॉंग्रेस नेत्यासोबत वाद झाल्यानं पवार संतापून बैठकीतून निघून गेले अन्…’; संजय राऊतांचा गौप्यस्फोट!

‘निक रात्री मला झोपू देत नाही अन् रात्री उठून माझ्यासोबत…’; प्रियांका चोप्राचा पतीविषयी मोठा खुलासा!

पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर पुनावाला यांची कोरोना लसीसंदर्भात मोठी घोषणा!

प्रेग्नन्सीनंतर अनुष्का चित्रपट सृष्टीला अलविदा करणार? अनुष्का शर्माचा मोठा खुलासा!

‘पुणेकरांनी शोधलेल्या लसीवर बाहेरून आलेल्यांनी दावा करू नये’; सुप्रिया सुळेंचा मोदींना इशारा