चक्क कुत्र्याची आणि घोड्याची जमली मैत्री, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | मैत्री हे असं नात आहे की, जे प्रत्येकजण आपल्याला हव्या त्या व्यक्तीबरोबर, प्राण्याबरोबर निर्माण करू शकतो. त्यासाठी कोणत्या अटी किंवा बंधन नसतात.

मैत्री म्हटल की आपल्या डोळ्या समोर लगेचंच एक निखळ वाहत पाण्याचं चित्र उभं राहत. का तर मैत्रीच नात हे अगदी या निखळ पाण्यासाखंच असतं.

आपण यापूर्वी मैत्रीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले असतील. तसाच आताही याच संदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये चक्क एका कुत्र्याची आणि घोड्याची चांगलीच गट्टी जमली असल्याचं पाहायला मिळतं आहे. ज्या प्रकारे घोड्याचा मालक त्याला फिरवून आणताना त्याच्या गळ्यातील दोरी आपल्या हातात घेऊन चालतो.

अगदी तसंच व्हिडीओमधील कुत्रा त्या घोड्याच्या गळ्यातील दोरी आपल्या तोंडात घेऊन चालत असल्याचं पाहायला मिळतं आहे.

एका मैदानावर एक घोडा आणि कुत्रा दोघंजण फिरायला जात आहेत. कुत्र्यानं घोड्याची लगाम आपल्या तोंडात धरली असून, त्या घोड्याला तो दिशा दाखवायचं काम करत आहे. कुत्रा पुढे-पुढे आणि घोडा त्याच्या मागे-मागे चालत असल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसून येतं आहे.

घोडा आणि कुत्र्याचा हा व्हिडीओ एका यूजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एक गोष्ट पुन्हा जाणवते की, मैत्रीला वयाच कोणतंच बंधन नसतं.

महत्वाच्या बातम्या-

भल्या मोठ्या सापांशी खेळायला गेला तरूण अन्…, पाहा अंगाचा थरकाप करणारा व्हिडीओ

चक्क कुत्र्यानं वाचवलं चिमुकलीला पाण्यात बुडण्यापासून, पाहा व्हिडीओ

प्रिया वारियरच्या ‘या’ फोटोंनी चाहते घायाळ, पाहा व्हायरल फोटो

धक्कादायक! केवळ एका चुकीमुळे चक्क तीन मजली इमारत कोसळली, पाहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ

धावत्या ट्रेनमध्ये तरूण करतोय स्टंटबाजी, पाहा व्हायरल व्हिडीओ