‘रूप पालटून फिरण्याचे शौकीन पंतप्रधान मोदी, पण आता फडणवीसही तेच करू लागलेत’; शिवसेनेचा टोला

मुंबई | एकनाथ शिंदेंच्या बंडाळीची देशभर चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. एकनाथ शिंदेंनी समर्थक आमदारांना सोबत घेत बंडखोरी केली व महाविकास आघाडी सरकार कोसळलं.

शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर शिवसेनेला सुरूंग लागला. तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाले व एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्रिपदी वर्णी लागली.

महाराष्ट्रातील या सत्तानाट्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यात फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सत्तानाट्यातील काही रंजक गोष्टींचा खुलासा केला.

एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी देवेंद्र फडणवीस वेषांतर करून जात असल्याचा गौप्यस्फोट अमृता फडणवीसांनी केला. यावरून शिवसेनेने देवेंद्र फडणवीसांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील निशाणा साधला आहे.

पंतप्रधान मोदी कपडे आणि रूप पालटून फिरण्याचे शौकीन आहेत. पण आता फडणवीस देखील तेच करू लागले आहेत. मोदींच्या लोकांनी त्याचे अनुकरण किती करावे पाहा, असा टोला शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून लगावण्यात आला आहे.

फडणवीसांनी महाराष्ट्रातील सत्तांतर घडवून आणण्यासाठी जे वेषांतर केले ते सर्व कपडे व ऐवज पुढच्या पिढीसाठी संग्रहालयात ठेवले पाहिजेत, अशी टीका देखील शिवसेनेने केली आहे.

दरम्यान, शिंदेंनी बंडामागचं भाजपचं कारस्थान विधानसभेत फोडलं व अमृता फडणवीसांनी घरातलं गुपित फोडलं. अमृता फडणवीसांनी हे रहस्य फोडलं नसतं तर या महान कलावतांची महाराष्ट्राला ओळख झाली नसती, अशी टोलेबाजी देखील शिवसेनेने केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

बायकोशी खोटं बोलून मैत्रिणीला भेटायला नवरा गेला मालदीवला, पुढे असं काही घडलं की…

भाजप आमदाराच्या घराबाहेर सापडलं लाखोंचं घबाड, राजकीय वर्तुळात खळबळ

“अमृता फडणवीसांनीच घरातलं गुपित फोडलं, नाहीतर या महान कलावंताची ओळख झालीच नसती”

चार पिढ्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा संपन्न

रावसाहेब दानवेंच्या दाव्याने शिवसेनेच्या गोटात खळबळ, म्हणाले…