125 वर्षीय स्वामी शिवानंदांसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदीही नतमस्तक, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | दिल्लीतील राष्ट्रपती भवनात झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी विविध व्यक्तिमत्त्वांना पद्म पुरस्काराने सन्मानित केलं. यावेळी बरीच चर्चा झाली ज्यांच्यासमोर खुद्द पीएम मोदींनीही नतमस्तक झाले.

काशीचे योगगुरू स्वामी शिवानंद यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. 125 वर्षीय स्वामी शिवानंद जेव्हा सन्मान स्वीकारण्यासाठी आले तेव्हा दरबार हॉल टाळ्यांचा गजर झाला. पीएम मोदींनीही त्यांना वाकून नमस्कार केला.

योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल स्वामी शिवानंद यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे वयाच्या 125 व्या वर्षी पद्मश्री पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्वामी शिवानंद स्वतः दिल्लीत पोहोचले.

योगासने आणि संयमी दिनचर्येने त्यांनी या वयातही स्वत:ला निरोगी ठेवलं आहे. योगाबद्दलचं त्यांचं समर्पण देशातील करोडो लोकांना उत्तम आरोग्यासाठी प्रेरित करतं.

स्वामी शिवानंद हे काशीचे रहिवासी आहेत. त्यांना योगगुरू म्हणूनही ओळखलं जातं. त्यांचा जन्म 8 ऑगस्ट 1896 रोजी बांगलादेशात असलेल्या सिलेट जिल्ह्यातील हरिपूर गावात झाला असं सांगितलं जातं.

योग, प्राणायाम आणि घरगुती उपचार हे निरोगी राहण्याची गुरुकिल्ली असल्याचं स्वामीजी सांगतात. स्वामी शिवानंद रोज पहाटे 3 वाजता उठतात आणि नंतर योगासन आणि श्रीमद भगवद्गीतेचे पठण करतात.

 

 

महत्त्वाच्या बातम्या- 

‘वहिनीसाहेबांचा आग्रह आहे तर…’; संजय राऊतांचं अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर 

मोठी बातमी! सर्वसामान्यांना महागाईचा झटका, पेट्रोल-डिझेल महागलं 

‘कोरोना संपलेला नाही अजून…’, अमेरिकेतील दिग्गज डॉक्टराचा जगाला अत्यंत गंभीर इशारा 

राज्यातील ‘या’ भागात येत्या दोन दिवसात पावसाची शक्यता! 

“पंतप्रधानांना 2 तासही झोपू द्यायचं नाही, हे भाजप नेत्यांनी ठरवलंय”