भाजपची सर्वात मोठी घोषणा, 26 मे ला देशभर…

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये पंतप्रधान पदाची शपथ घेतली. येत्या 26 मे रोजी मोदी सरकारला आठ वर्षे पुर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने देशभर हनुमान चालीसाचं पठण करण्यात येणार आहे.

भाजपकडून देशभरात उपक्रम राबवण्यात येणार आहे. मंदिरांमध्ये पुजा, यज्ञयाग केलं जाणार आहे. देशभरामध्ये लाभार्थी संमेलन, युवा संमेलन आणि मागासवर्गीयांचे संमेलन आयोजित करण्यात आलं आहे.

केंद्र सरकारने देशभरामध्ये उज्ज्वला योजना, जन धन, हर घर नल अशा योजना सुरू केल्या आहेत. केंद्र सरकारने अनेक  योजना राबवल्या असून नवभारताच्या निर्मितीकडे वाटचाल सुरू आहे, असं भाजपकडून सांगण्यात येत आहे.

सोमवारी संध्याकाळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांनी राष्ट्रीय सरचिटणिसांची बैठक बोलावलेली आहे. केंद्र सरकारला 8 वर्षे पुर्ण होत असल्याने अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदी, कलम 370, पीएम किसान सन्मान योजना, उज्ज्वला गॅस योजना, अशा काही योजना आणि अनेक महत्त्वपुर्ण निर्णय घेतले आहेत. तसेच येणाऱ्या काळात पंतप्रधानांसमोर महागाई, बेरोजगारी कमी करण्याचं आव्हान असणार आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून हनुमान चालीसावरून राजकारण तापलेलं आहे. त्यातच आता भाजपकडून देशभरात हनुमान चालीसा पठण करण्यात येणार आहे.

भाजपकडून एकीकडे हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर काँग्रेस नेते राहुल गांधींनी केंद्र सरकावर हल्लाबोल केला आहे.

आठ वर्षांच्या मोठ्या चर्चेचा परिणाम म्हणून भारताकडे केवळ 8 दिवसांचा कोळसा शिल्लक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी द्वेषाचे बुलडोझर थांबवून वीज प्रकल्प सुरू करावेत, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 
मोठी बातमी! किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी शिवसेना नेत्याला अटक

…तर एक दिवस आत्महत्या करण्याची वेळ येईल- नितीन गडकरी 

प्रशांत किशोर यांच्या ‘त्या’ प्रस्तावानंतर सोनिया गांधींनी उचललं मोठं पाऊल!

“…तरच राज्यातील मशिदींवर असलेले भोंगे हटवण्यात येतील” 

‘…म्हणून आम्ही सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार घातला’; फडणवीसांनी सांगितलं कारण