ब्रँड इज ब्रँड! ‘क्रिकेट विश्वाच्या इतिहासात तुझं नाव…’; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माहीला पाठवलं खास पत्र

नवी दिल्ली | भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने अचानकपणे कोणालाही कसलीच कल्पना न देता 15 ऑगस्टला आंतरराष्ट्री क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली. धोनीच्या निवृत्तीची माहिती चाहत्यांना समजल्यावर चाहते खूप निराश झाले होते. मात्र अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धोनीला पत्र पाठवत त्याचे धन्यवाद मानले आहेत. यासंदर्भात धोनीने ट्विट करत माहिती देत त्या पत्राला धन्यवाद दिले आहेत.

भारतीय क्रिकेटला जगात सर्वोच्च स्थानावर पोहोचवण्यासाठी तूझं खूप मोठं आणि मोलाचं योगदान आहे. क्रिकेट विश्वाच्या इतिहासात  तुझं नाव जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये, सर्वोत्तम कर्णधारांमध्ये आणि कीपरपैकी एक आहे. कठीण सामना आपल्या शैलीने परत मिळवणं आणि सर्वात भारी म्हणजे 2011 चा  विश्वचषकाचा अंतिम सामना हा कित्येक पिढ्यांच्या लक्षात राहणार असल्याचं मोदींनी म्हटलं आहे.

आपण ठरवलेल्या ध्येयाकडे जाताना आपली वाटचाल कोणत्या दिशेने चालू असेल तेव्हा आपण कुठून आले आहोत हे महत्वाचं नसल्याचं धोनीने सर्व जगाला दाखवून दिलं, असल्याचं मोदींनी पत्रात म्हटलं आहे.

15 ऑगस्टला तुझ्या साध्या शैलीत एक व्हिडीओद्वारे निवृत्तीची घोषणा केली. या घोषणेनंतर 130 कोटी भारतीय नाराज झाले. तू गेल्या दीड दशकात भारतासाठी जे काम केलं त्यासाठी धन्यवाद, असं मोदींनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, एक सौनिक कलाकार आणि खेळाडूला आपण  करत असलेल्या कामाची कौतूक झालं पाहिजे आणि आपल्या मेहनतीची आणि बलिदानाची जाणीव लोकांना व्हावी, अशी त्यांची इच्छा असते असं ट्विट करत धोनीने मोदी आपण केलेल्या कौतूकाबद्दल आपले आभार मानले आहेत.

 

महत्वाच्या बातम्या-

मुंबई पोलिसांना न्यायाच्या आणि सत्याच्या मार्गावर असताना रोखलं हे बरोबर नाही- संजय राऊत

काय सांगता…! कांदा एवढा लाभदायी आहे; सविस्तर वाचा

रिया आणि सुशांतच्या नात्याची सुरुवात कशी झाली?; रियाने सांगितली ‘लव्ह स्टोरी’

भाजपचा कॉंग्रेसला मोठा झटका! कॉंग्रेसच्या पाच आमदारांनी हाती घेतला भाजपचा झेंडा

धोनीचं करियर कोणी संपवलं?, चहलनं सांगितलं नेमकं कारण; म्हणाला…